Home /News /maharashtra /

2 लहान पिल्लांना कुर्‍हाडीने केले ठार, चिडलेल्या अस्वलीने जे केलं ते पाहून गाव हादरले!

2 लहान पिल्लांना कुर्‍हाडीने केले ठार, चिडलेल्या अस्वलीने जे केलं ते पाहून गाव हादरले!

घटनास्थळाचा 15 ते 20 फुटावर जवळच अस्वलाची 2 आठ महिन्याचे पिल्ले कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार मारले होते.

बुलडाणा, 12 जून : जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्रामध्ये हे एका चिडलेल्या अस्वलाने जंगलात गेलेल्या दोघा इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळाच्या लगतच अस्वलाच्या 2 लहान पिल्लांना कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याने अस्वलाने चिडून या दोघांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारामध्ये अशोक मोतीराम गवते (वय 52)  आणि माना बंडू गवते (वय 42) हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गावात क्षेत्रातील आलेवाडी नियत क्षेत्रामध्ये गेले असता त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हेही वाचा -दारूचा ग्लास नीट भर म्हणून त्याने आणला हातोडा, दारुड्या मित्रांनी जे केलं ते... हा हल्ला इतका भीषण होता की,  अस्वलाने एका व्यक्तीच्या पूर्ण चेहरा छिन्न-विच्छिन्न केलेला होता. यामुळे सदर अस्वल हा चिडलेल्या असल्याचे हा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचा 15 ते 20 फुटावर जवळच अस्वलाची 2 आठ महिन्याचे पिल्ले कुणीतरी कुर्‍हाडीने वार करून ठार केल्याच्या अवस्थेत दिसून आली. यामुळेच मादा अस्वलाने जंगलात गेलेल्या व्यक्तींवर हल्ला चढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हेही वाचा - वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण... याप्रकरणी वनविभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून आकोट व्याघ्र प्रकल्पमध्ये वन गुन्हा दाखल केला आहे. अस्वलीने दोन जणांवर हल्ला करून ठार मारल्यामुळे आलेवाडी शिवारातील नागरिकांमध्ये भितेचे वातावरण पसरले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या