Home /News /maharashtra /

वाहन नाही, न रुग्णवाहिका; झोळीतच झाली प्रसूती अन् जगात येण्याआधी बाळाने मिटले डोळे, पालघरमधील मन सुन्न करणारी घटना

वाहन नाही, न रुग्णवाहिका; झोळीतच झाली प्रसूती अन् जगात येण्याआधी बाळाने मिटले डोळे, पालघरमधील मन सुन्न करणारी घटना

'डोलीतून नेताना महिलेची अर्धी प्रसूती झाली, तिचे अर्धेबाळ बाहेर आले होते. कसेबसे तिला वाहनापर्यंत पोहचवले, वाहनातून जाताना रस्त्यात तिला अतिवेदना सुरू झाल्या'

पालघर, 28 नोव्हेंबर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील  जव्हार तालुक्यातील एका महिलेला प्रसूतीच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या मात्र, वेळेवर वाहन तथा रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली. शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान घडली आहे. कल्पना राजू गवते या महिलेसोबत ही दुर्दैवी घटना घडली. कल्पना यांना अचानक प्रस्तुच्या वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र हुंबरणापासून जवळ असलेले किनव्हली गावापर्यंत कुठलेही वाहन उपलब्ध झाले नाही. रुग्णवाहिका सुद्धा मिळाली नाही, अशा परिस्थितीत डोली करून नेणेही शक्य नव्हते. त्यामुळे कल्पना राऊत यांचा पती पायी किन्हवली गावात पोहचला. परंतु, तेथेही कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते, तो पुन्हा घरी आला आणि गावकऱ्यांनी तिला कसंबसं डोली करून आणले, मात्र यात खूप वेळ निघून गेला होता. दरम्यान, डोलीतून नेताना महिलेची अर्धी प्रसूती झाली, तिचे अर्धेबाळ बाहेर आले होते. कसेबसे तिला वाहनापर्यंत पोहचवले, वाहनातून जाताना रस्त्यात तिला अतिवेदना सुरू झाल्या, वाहन अर्ध्या रस्त्यात थांबवले. दरम्यान जंगलातच तिला प्रसूती झाली, मात्र बाळाचा मृत्यू झाला होता. तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा येथील हुंबरणा हे गाव शेवटच्या टोकाला असल्यामुळे तेथे आजही रस्ता नाही. हे गाव अतिदुर्गम व डोंगराळ भागात आहे, येथे दळणवळणाची व्यवस्थित सोय नाही. आरोग्य सेवाही मिळत नाही. त्यामुळे याभागात सुविधे अभावी दुर्दैवी घटना घडत आहेत. 'स्वतंत्र होऊन गेली 74 वर्ष होऊन देखील असा घटना घडतात. या पेक्षा अजून दुर्दैव काय आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे हिच अपेक्षा आहे', असं मत सामाजिक कार्यकर्ते  प्रदीप कामडी यांनी व्यक्त केले. तर, 'या घटनेबद्दल मला आताच फोन वरून माहिती मिळाली आहे, याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन घटनेची माहिती घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करणार आहे, असं आश्वासन जव्हार तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या