• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 15 महिन्याची रिदा झोपलेली असताना काकूने येऊन चपलेनं केली मारहाण, LIVE VIDEO

15 महिन्याची रिदा झोपलेली असताना काकूने येऊन चपलेनं केली मारहाण, LIVE VIDEO

काकू रेशमा शेख ही मुलीजवळ आली आणि तिने तिला चपलेनं मारहाण केली. हा सर्व प्रकार मुलीच्या आईने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.

काकू रेशमा शेख ही मुलीजवळ आली आणि तिने तिला चपलेनं मारहाण केली. हा सर्व प्रकार मुलीच्या आईने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.

काकू रेशमा शेख ही मुलीजवळ आली आणि तिने तिला चपलेनं मारहाण केली. हा सर्व प्रकार मुलीच्या आईने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.

  • Share this:
मीरा भाईंदर, 18 सप्टेंबर : घरगुती वादातून लहान चिमुरड्यांना मारहाण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मिरा-भाईंदरमध्ये (mira bhayandar )  सख्या काकूने आपल्या 15 महिन्याच्या लहान पुतणीला चक्क चपलेनं मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिराभाईंदरमधील न्यायनगर परिसरात ही घटना घडली आहे. रेशमा शेख असं या विकृत काकीचं नाव आहे. आपली मुलगी एकटी असताना तिला कोणीतरी मारत असल्याचा संशय बाळाची आई आसमा शेख यांना होता. त्यामुळे मुलगी एकटी असताना मोबाईलमधील व्हिडीओ चालू करून तिची आसमा शेख या बाहेर जात असे. काल तिची आई बाथरूममध्ये गेली. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीच्या समोर मोबाईल कॅमेरा ऑन करून ठेवला होता. पण, जेव्हा त्या बाथरूममधून परत आल्या तेव्हा 15 महिन्याची मुलगी रडत असून तिला मारहाण झाल्याचे दिसले. यावर तिने आपला मोबाईलचा व्हिडीओ पाहिला असता हा सर्व प्रकार समोर आला आहे. काकू रेशमा शेख ही मुलीजवळ आली आणि तिने तिला चपलाने मारहाण केली असल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार मुलीच्या आईने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मारकुट्या काकूविरोधात गुन्हा नोंदवला आहे. रेशमा आणि आसमा शेख यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद होता. आसमा शेख आणि त्यांच्या पतीने सासऱ्याचं घर सोडून निघून जावे, असा तगादा लावत होते. यावरून दोघांमध्ये भांडणही झाले होते. याच वादातून जाऊ रेशमा हिने 15 महिन्याच्या रिदाला मारहाण करत होती. अखेर तिचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तिच्या आजोबांनी रेशमा शेख हिच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नसून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
Published by:sachin Salve
First published: