स्मशानाभूमीतून मृतदेहाची राख चोरीला, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का!

स्मशानाभूमीतून मृतदेहाची राख चोरीला, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का!

पंढरपूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाच्या राखेची विटंबना केली जात आहे.

  • Share this:

पंढरपूर, 11 जानेवारी : पंढरपुरातील कुणी मृत झालं की त्यावर चंद्रभागा नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करतात. काही जण मृत माणसाच्या अंगावरील दागिने न काढता तसेच अग्नी देतात. विशेषतः महिला मृत झाली असेल तर अंगावर दागिने असतातच. याच सोन्याची रात्रीच्या अंधारात चोरी होत आहे.

मृतदेहास अग्नी दिल्यानंतर त्याची राख होते. हीच राख मध्यरात्रीच्या अंधारात चोरली जाते. यासाठी तीन लोक स्मशानभूमीत जातात. मृतदेहाची झालेली राख गोळा करायची हातातील चाळणीने ती चाळायची. यामधून त्या राखेतील वितळलेला सोन्याचा तुकडा काढून घ्यायचा. चोरून गोळा केलेली राख कुठेही टाकायची. नंतर पसार व्हायच हा प्रकार पंढरपुरातील स्मशानभूमीत काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्ये नंतरचे विधी करण्यासाठी नागरिकांनी आपल्याच मृत नातेवाईकाची राख मिळेलच याची खात्री नाही.

स्मशानभूमीत सध्या तरी सुरक्षारक्षक तसंच सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने या चोरांना राखेतून सोनं काढण्यासाठी कसलीच भीती वाटत नसल्याचे दिसतंय. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आता नगरपरिषदेला जाग आली आहे. नगरपरिषदेने तात्काळ कोणतीही उपाययोजना केली नाही.

मात्र, भविष्यात स्मशानभूमीत सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमण्याच आश्वासन दिल आहे. पंढरपूर पोलीसांनी सुद्धा अशा घटना घडत असल्याचं मान्य केलं असून अशा पद्धतीने झाल्या असेल आणि त्यांच्या नातेवाईकांना तक्रार दिली तर कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: sachin Salve
First published: January 11, 2020, 6:10 PM IST

ताज्या बातम्या