भिवंडी, 28 जुलै : सर्व जगात कोरोनाने हाहाकार माजवल्याने आपल्या देशात सुद्धा कोरोनाचा फटका हा व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी त्यांच्यासह कलाकारांना सुद्धा बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील भिनार गावात सुंदर अशा चलचित्र मूर्त्या बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांवर आता उपासमारीचे संकट आले आहे.
भिवंडी तालुक्यातील भिनार इथं जितू भोईर यांचा जितू कला केंद्र नावाचा चलचित्र मूर्त्या बनवण्याचा कारखाना आहे. यामध्ये सुंदरअशा चलचित्र मूर्त्या बनवल्या जातात. त्यामध्ये संत तुकाराम महाराज, शंकर, छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, देवी तसेच बैल, वाघ, हत्ती, घोडे अशा विविध प्रकारे सुंदर आणि सुबक चलचित्र मूर्त्या बनवण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून जितू भोईर यांचा हा व्यवसाय सुरू आहे.
ठाण्यातील टेंभी नाका येथील होणारे शिव जयंती, हनुमान जयंती, दहीहंडी, नवरात्र उत्सव या कार्यक्रमात सजावट करण्याचे काम ते करत होते. त्यामुळे त्यांच्या अचूक आणि सुंदर कामामुळे महाराष्टात नव्हे तर संपूर्ण भारत देशातील विविध राज्यात त्यांची ओळख झाली आहे.
त्यामुळे गुजरात, बडोदा, राजस्थान, भुज, रामलीला मैदान, पंजाब, जालंधर, हरिव्दार, अंधरप्रदेश, कर्नल, मध्यप्रदेश, दिल्ली तसेच पंढरपूर चंद्रभागा वाळवंट इथं खूप देखावे करून बहुसंख्य मॉडेल बाहेर देशातही पोहचल्या आहेत. त्यांच्याकडे डेकोरेशन सेटअप, चलचित्र मॉडेल, एनिमल्स, सोपा सिलिंग इंटिरियल अशी खूप कामे केली जातात.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन त्यातच कोरोनाचा वाढता धोका त्यामुळे जितू भोईर हे त्यांच्या कल्याणमधील घरीच चार महिन्यांपासून अडकून पडले त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने लाखो रुपयांच्या सुंदर आणि सुबक अशा चलचित्र मूर्त्या पडून आहेत.
त्यामुळे आता मुलांच्या शाळेची फी, लाईट बिल, जागेचे भाडे, कामगारांचे पगार त्यांच्या घराचे भाडे कसे भरायचे आणि खायचे काय अश्या अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या गणपतीमध्ये काम मिळू शकते. मात्र, सरकारच्या निर्बंधामुळे आता उपासमारीचे संकट येणार आसल्याने सरकारने मदत करावी तसेच बँकेच्या माध्यमातून कर्जाची तरी व्यवस्था करावी अशी मागणी जितू भोईर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली आहे.