पण, पुराच्या पाण्यात काही अंतर दूर केल्यानंतर एखाद्या चमत्काराप्रमाणे काही जनावरं पाण्यातून बाहेर आली. त्यानंतर लोकांनी जनावरांना अडवून ठेवलं. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पण, पुराच्या पाण्यातून जनावरं बाहेर आल्याचे पाहून उपस्थितीत लोकांनी तोंडात बोटं घातली. थरकाप! झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आल्यावर केला हल्ला दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्येही पाणी साठा वाढला असून सर्वच जनजीवन विस्कळीत झालं आहे छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्याने अनेकांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ढगफुटी जन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 18 वर्षीय तरुण गेला वाहून! तर शेगांव तालुक्यातील मौजे जवळा येथील आदित्य संतोष गवई (वय 18) हा पुराच्या पाण्यात वाहून गेला त्याचा मृतदेह सापडला असून पोस्टमार्टमसाठी साई बाई मोटे रुग्णालयात रवाना केला आहे. हा मृतदेह जवळापासून काही अंतरावर तिन्त्रव या गावानजिक असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ आढळून आला.बुलडाण्यात पावसाचा हाहाकार, खामगाव जवळच्या बोर्डी नदीत 5 जनावरं गेली वाहून pic.twitter.com/YcOgR7qZRP
— News18Lokmat (@News18lokmat) September 7, 2021