Home /News /maharashtra /

नारायण राणेंवर पोलिसांनी कारवाई केली त्यात चूक काय? वकिलांनी कोर्टात मांडली दुसरी बाजू

नारायण राणेंवर पोलिसांनी कारवाई केली त्यात चूक काय? वकिलांनी कोर्टात मांडली दुसरी बाजू

नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू पोलिसांची दडपशाई आहे, असे इशारे नारायण राणे यांनी दिले.

नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू पोलिसांची दडपशाई आहे, असे इशारे नारायण राणे यांनी दिले.

नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू पोलिसांची दडपशाई आहे, असे इशारे नारायण राणे यांनी दिले.

    सिंधुदुर्ग, 29 डिसेंबर : शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहे. तर याच प्रकरणी नितेश यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना सिंधुदुर्गातील कणकवली पोलिसांकडून नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पण, नारायण राणे केंद्रीय मंत्री असून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याची भाषा करत असले तर पोलिसांनी कारवाई केली तर काय चुकूलं? अशी माहितीच सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे. या नोटीसीवरून भाजपच्या नेत्यांनी वाद निर्माण केला आहे. 'या प्रकरणात सत्तेचा दुरुपयोग चालू आहे. नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू पोलिसांची दडपशाई आहे, असे इशारे नारायण राणे यांनी दिले. मग पोलिसांनी कारवाई केली तर त्यांची चूक काय आहे, असा मुद्दा अॅड. प्रदीप घरात यांनी  न्यायालयासमोर मांडला. (सलमान खानला 'या' सेलिब्रेटींकडून मिळाल्या महागड्या भेटवस्तू; पाहा LIST) तसंच, जर, आम्ही जे पुरावे सादर केले आरोपींच्या लिंक मिळतात, कॉल डिटेल्स मिळालं यावरून सहभाग निष्पन्न होत नाही का? आमचे तांत्रिक मुद्दे आरोपीच्या वकिलांनी खोदून दाखवावे. फक्त संतोष परब यांच्यावर हल्ला करून निवडणुकीचे राजकारण करतात हे योग्य नाही, हा आरोप योग्य नाही, असा युक्तीवादही घरत यांनी केला. दरम्यान, नारायण राणे काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का? असं विधान त्यांनी केलं होतं.  एक केंद्रीय मंत्री आहात आणि एवढे हायपर का होतात? महाराष्ट्र पोलीस जर त्यांचे असतील तर केंद्रात आमची सत्ता आहे. मग मुलांना वाचवण्यासाठी ही पोलिसांना धमकी नाही का? असा सवालही  सरकारी वकिलांनी कोर्टात उपस्थितीत केला. (नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त, या राज्याच्या CMचं जनतेला मोठं गिफ्ट) केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली आहे. नोटीसनुसार, आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. काल पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नितेश राणेंचा ठावठिकाणा विचारला असता ठिकाण सांगायला मी काय मूर्ख आहे का ? असे विधान केले असल्याचा नोटीसीत उल्लेख केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या