अल्पवयीन मुलीवर केले होते अत्याचार, रुग्णालयातून बेड्यासह पळाला आरोपी!

अल्पवयीन मुलीवर केले होते अत्याचार, रुग्णालयातून बेड्यासह पळाला आरोपी!

आरोपीने पळ काढल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि रुग्णालयातीत कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

श्रीरामपूर, 10 डिसेंबर : वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन आलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत बेड्यांसह पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं घडली.

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी आरोपी राहुल गणेश शिंदे (वय २०) याला तीन पोलीस कर्मचारी घेऊन आले होते. परंतु, तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने पळ काढला. आरोपीने पळ काढल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि रुग्णालयातीत कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला. पण रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला.  शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली.

आरोपी शिंदेनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्याच्यावर याआधी मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे. या घटनेबद्दल विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 8:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading