• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बलात्कार करून पळून गेला होता नराधम, पोलिसांनी हनी ट्रॅपचं जाळं टाकलं आणि...

बलात्कार करून पळून गेला होता नराधम, पोलिसांनी हनी ट्रॅपचं जाळं टाकलं आणि...

एका पोलीस मित्र महिला त्याच्या नवीन फोन नंबरवर फोन करून त्याच्याशी गोड गोड बोलून लागली..

एका पोलीस मित्र महिला त्याच्या नवीन फोन नंबरवर फोन करून त्याच्याशी गोड गोड बोलून लागली..

एका पोलीस मित्र महिला त्याच्या नवीन फोन नंबरवर फोन करून त्याच्याशी गोड गोड बोलून लागली..

  • Share this:
नालासोपारा, 24 सप्टेंबर : राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. नालासोपाऱ्यातील (nalasopara) तुळींज पोलीस (tulij police station) ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार (rape) करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीला ठाणे  (thane) येथील आनंदनगरमधून अखेर अटक (arrest) करण्यात आली आहे. पोलिसांनी हनीट्रॅपचं (honey trap) जाळं टाकून या नराधमाला मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरज सारसद( 24 ) असं आरोपीचं नाव आहे. त्याने जानेवारी महिन्यात 2021मध्ये एका 16 वर्षाच्या पीडित मुलीला सुरज ने त्याच्या घरी बोलावून त्याच तिच्यावर अत्याचार केला होता.  मात्र तिला धमकी दिल्याने घाबरून जाऊन तक्रार केली नव्हती सदर घटनेची माहिती तिने तिच्या मैत्रिणीला दिल्यानंतर मैत्रिणीने पीडित मुलीच्या नातेवाईकांना सांगितले. व्याज नाही दिलं म्हणून तालिबानी शिक्षा; विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तत्पूर्वी आरोपी फरार झाला होता. आरोपीने त्याचे चालू मोबाईल नंबर बंद करून नवीन नंबर घेऊन त्याच राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. आरोपीला अटक करण्या करिता पोलिसांनी रेल्वेपासून ते रिक्षा आणि बसचा प्रवास करावा लागला आहे. एका महिन्यांपूर्वी आरोपी सूरज सारसद हा ठाण्याच्या आनंद नगर परिसरात राहत होता. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मल्हार थोरात व या गुन्ह्याचे तपास अधिकारी यांना सूरज ठाण्यात असल्याची चाहुल लागताच आरोपी सूरजला गजाआड करण्या करिता त्याचा तांत्रिक माग काढला मात्र तो पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हता. सायबेरियाच्या जंगलात पेटला भीषण वणवा; Climate Change शी आहे कनेक्शन पोलीस त्यांच्या घरी गेल्यावर आरोपीला घरचे लोक सतर्क करतील, त्यामुळे पोलिसांनी एका महिला पोलीस मित्र महिलेला त्याच्या नवीन फोन नंबरवर फोन करून त्याच्याशी गोड गोड बोलून लागली. सूरजला वाटले की, आयती एक पुन्हा संधी चालून आली आहे. यामुळे तो आनंदित झाला होता. पोलीस मित्र महिलेनं त्याला फाउंटन जवळ कॉफी पिण्यासाठी बोलवले. मात्र तो तिथे आला नाही. शेवटी त्यांनी सूरजला ठाण्याच्या एका सिग्नलजवळ बोलावले तिथे चहा पिण्यासाठी बोलावले असता तिथे आल्यावर साध्या वेशात असणाऱ्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
Published by:sachin Salve
First published: