हॉस्पिटलमध्ये आरोपींनी केला ड्रामा, पोलिसांनी दोघांना पकडलं पण...

हॉस्पिटलमध्ये आरोपींनी केला ड्रामा, पोलिसांनी दोघांना पकडलं पण...

वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात या आरोपींना आणण्यात आले होते.

  • Share this:

पिंपरी, 27 मे : वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणलेल्या तीन आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात एक आरोपी पसार झाला असून  पोलिसांच्या सतर्कतेमुळे इतर दोन आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न मात्र फसला.  ही घटना पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय इथं घडली.

या याप्रकरणी आकाश  पवार, गणेश ऊर्फ अजय कांबळे  आणि काळेवाडीतील रहिवासी कृष्णा सोनवणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 3 आरोपींना गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, कबुतरांची ढाबळ,  या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात 26 मे रोजी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आणण्यात आले होते. त्यावेळी तीनही आरोपींनी पोलिसांशी वाद घालत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेनं फटकारलं

त्यापैकी कृष्णा सोनवणे आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, इतर दोघांना पोलिसांनी धरून ठेवले. या तिघांविरुद्ध पोलीस कस्टडीमधून पळून जाणयाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश केंगार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: May 27, 2020, 9:53 AM IST

ताज्या बातम्या