मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोबाईलवरून कामाला सुरुवात केली आज आहे स्वत:चं ऑफिस, डोंबिवलीकर पार्टनरची सक्सेस स्टोरी

मोबाईलवरून कामाला सुरुवात केली आज आहे स्वत:चं ऑफिस, डोंबिवलीकर पार्टनरची सक्सेस स्टोरी

X
संपूर्ण

संपूर्ण जग संकटाचा सामना करत असताना डोंबिवलीच्या तरूणांनी वयाच्या 21 व्या वर्षी मोठं धाडस केलं.

संपूर्ण जग संकटाचा सामना करत असताना डोंबिवलीच्या तरूणांनी वयाच्या 21 व्या वर्षी मोठं धाडस केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी

डोंबिवली, 20 मे :  महाविद्यालयीन आयुष्यात प्रत्येकाची काही स्वप्न असतात. कॉलेज लाईफ संपल्यानंतर त्या स्वप्नांचा पाठलाग करत ती यशस्वी करणं हे खूप कमी जणांना जमतं. त्यातच कोरोना व्हायरस आणि नंतरच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची उलथापालथ झालीय. अनेक व्यवसाय बंद झाले. कित्येकांचे रोजगार गेले. या निराशेच्या आणि आव्हानात्मक काळात डोंबिवलीच्या 2 तरुणांनी नवा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस दाखवलं आणि तो यशस्वी देखील केलाय.

कसं उभारलं विश्व?

सोनल सुर्वे आणि समीर गुडेकर या वर्गमित्रांनी महाविद्यालयातून बाहेर पडताच सोशल मीडिया ब्रँडींग आणि जाहिरातीचा व्यवसाय सुरू केलाय. या आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा ते फक्त 21 वर्षांचे होते. लॉकडाऊंमुळे सर्व जग बंद होतं. त्यानंतरही त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं.

'हा व्यवसाय सुरू केला तेव्हा आमच्याकडं जागा ही नव्हती. आम्ही कधी माझ्या तर कधी सोनलच्या घरी काम करत असू. काही वेळा आपआपल्या घरात राहून फोन आणि नेटच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहून आम्ही हे काम करत होतो. हे काम करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या. घरातील लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं. आमच्या मनातही काही वेळा व्यवसाय बंद करण्याचे विचार ले, त्यानंतरही आम्ही जिद्दीनं आणि अडचणीतून मार्ग काढत हा व्यवसाय सुरू ठेवला. माझ्याकडं सुरूवातीला लॅपटॉप घेण्यासही पैसे नव्हते, त्यामुळे मी मोबाईलवरूनच बरीच काम करत असे,' अशी माहिती समीरनं दिली.

हाडं गोठवणारी थंडी, श्वास घ्यायलाही अडचण, पण 6 वर्षांची आरिष्का 130 किमी चालली, VIDEO

ज्या व्यवसायिकांना सोशल मीडिया हाताळता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही 'ओके देन' या आमच्या स्टार्टअपच्या माध्यमातून ब्रँडींगचं काम करतो. आमच्या टीममधील सर्व जण तरुण आहेत. त्यांनी कॉलेज संपल्यावर सुरूवातीला इंटर्न म्हणून आमच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर ते आता पूर्णवेळ सहकारी बनले आहेत. आता आमचं डोंबिवलीत स्वत:चं ऑफिस असून तिथून आम्ही हे सर्व काम करत आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सोनल आणि समीर यांनी लहान वयातच व्यवसाय सुरू केलाय. हा व्यवसाय वाढवतानाच त्यांनी सामाजिक भानही जपलंय. व्यावसायिकांना विस्तार करण्यासाठी मदत करणे हा आमचा उद्देश आहे. त्यांना सोशल माीडियाची योग्य प्रकारे हाताळता यावा यासाठी त्यांनी मोफत कार्यशाळाही सुरू केलीय. त्याचबरोबर डोंबिवलीतील ऑफिसमध्ये वाचन कट्टाही सुरू केलाय. रोजच्या कामात कंटाळा आला तर इथं बसून टीम मेंबर्सना पुस्तकं वाचता येतात.

First published:
top videos

    Tags: Dombivali, Local18, Thane