मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बैलगाडा शर्यत सुरू झाली अन् स्टेजवर घडला भलताच प्रकार, आयोजकही झाले हैराण

बैलगाडा शर्यत सुरू झाली अन् स्टेजवर घडला भलताच प्रकार, आयोजकही झाले हैराण

स्पर्धेला उशीर झाल्याचा फायदा चोरांनी घेतला

स्पर्धेला उशीर झाल्याचा फायदा चोरांनी घेतला

आयोजकांनी 'गदा चोर, ज्यांनी कुणी गदा चोरली असेल त्यांनी स्टेजवर आणून द्यावी, असं आवाहन माईकवरून करण्यास सुरूवात केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी

डोंबिवली, 26 मे 2023 :  सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीला जोरदार सुरूवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात या स्पर्धा आता जल्लोषात सुरू झाल्या आहेत. कल्याण जवळच्या खरड गावात भाजपा आमदार गणपत कदम यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, या शर्यतीमध्ये चोेरट्यांनी तब्बल दहा ते बारा गदा चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कल्याण पूर्वमधील खरड गावात ही बैलगाडा स्पर्धा झाली. ही स्पर्धा पूर्ण होण्यास बराच उशीर झाला. त्यावेळी पडलेल्या अंधाराचा फायदा चोरांनी घेतला. त्यांनी बक्षिसासाठी स्टेजवर ठेवलेल्या गदा चोरीला नेल्या. यावेळी तब्बल दहा ते बारा गदा चोरीला गेल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन्...; नवरीसोबत भयंकर घडलं

पोलीस बंदोबस्तामध्ये तसंच आयोजकांच्या उपस्थितीमध्ये चोरांनी हात साफ केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनलीय. बक्षीस समारंभाच्यापूर्वी हा प्रकार उघड झाल्यानंतर आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. आयोजकांनी 'गदा चोर, ज्यांनी कुणी गदा चोरली असेल त्यांनी स्टेजवर आणून द्यावी, असं आवाहन माईकवरून करण्यास सुरूवात केली. या प्रकरणात हिललाईन परिसरात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Kalyan, Local18