भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
बदलापूर, 23 मे : शारीरिक व्यंगता आली की माणूस असहाय्य बनतो. त्याला दुसऱ्याचा मदतीची गरज भासते. या काळात त्याला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते ? मात्र प्राणी अपंग झाले तर त्यांना निवारा कोण देणार असा प्रश्न निर्माण होतो. माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही आधार लागतो. प्राण्यांना हा आधार देण्याचं काम ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे डॉ. अर्चना जैन आणि गणराज जैन करतं आहेत. त्यांनी या काळजीतूनच बदलापूरच्या चमतोली गावात पाणवठा हे अनाथलय सुरू केलंय. त्याचं हे अनाथालय या भागातील अपंग प्राण्यांचं हक्काचं घर झालंय.
कशी झाली सुरूवात?
गणराज जैन यांना काही वर्षांपूर्वी नाग चावला होता. त्यानंतर ते आठवडाभर मृत्यूशी झुंज देत होते. या घटनेनंतर त्यांची आयुष्याकडं पाहण्याची दृष्टी बदलली. ते यापूर्वी अपंग प्राण्यांसाठी अर्धवेळ काम करत असतं. पण, मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर त्यांनी तेच आयुष्याचं ध्येय केलं. आपल्या या मिशनमध्ये पत्नी डॉ. अर्चना त्यांना साथ देतात.
गणराज जैन यांना काही वर्षांपूर्वी नागाने चावा घेतला. त्यानंतर ते सात दिवस जीवन मरणाशी हॉस्पिटल मध्ये झुंझत होते. मात्र त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ अनाथाश्रम चालवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना यांनी पूर्ण साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. अनेक संकट झेलून त्यांनी हे अनाथाश्रम उभे केले आहे.
गणराज आणि अर्चना यांच्या या आश्रमात 110 अपंग प्राणी आहेत. ते जणू त्यांचे पालकच बनले आहे. अर्चना या वांगणींध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यामधून आलेले काही पैसे घराला देऊन उर्वरित सर्व पैसे ते या अनाथआश्रमासाठी देतात. त्यांच्या खाण्याचा तसंच उपचाराचा खर्चही या आश्रमात केला जातो. या सर्व प्राण्यांच्या एक दिवसाचा खाण्याचा खर्च हा 3 हजार रूपये आहे, असं गणराज यांनी सांगितलं.
वाघांच्या राज्यात रंगबेरंगी दुनिया, पेंचमध्ये फुलपाखरांच्या तब्बल 'इतक्या' प्रजाती, PHOTOS
'गाडी चालवताना होणाऱ्या अपघातामध्ये प्राणी जखमी होण्याचं प्रमाण मोठं आहे. कुणीही जाणीवपूर्वक अपघात करत नाही. पण, आपल्यापेक्षा या प्राण्यांना कमी समजतं. याची जाणीव ठेवून काळजीपूर्वक गाडी चालवावी. त्यामधून हे अपघात टळतील,', असं आवाहन गणराज यांनी केलं.
आम्ही सुरूवातीला हे अनाथालय तयार केलं त्यावेळी त्यामध्ये नेहमीसारखीच सर्व व्यवस्था केली होती. मात्र त्यांची एखाद्या विशेष मुलासारखी काळजी घ्यावी लागणार, असं आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही प्राण्यांसाठी विशेष घरं तयार केली. त्या घरामध्ये दिवेही लावले आहेत, असं गणराज यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Badlapur, Local18, Pet animal, Thane