Home /News /maharashtra /

सापाशी खेळ तरुणाला पडला महागात; सर्पदंशाने तडफडून मृत्यू

सापाशी खेळ तरुणाला पडला महागात; सर्पदंशाने तडफडून मृत्यू

Thane youth died after snake bite: सापासोबत खेळ करणं मुंब्य्रातील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने आपला जीव गमावला आहे.

ठाणे, 28 जुलै: सापासोबत खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. सापाला पकडून त्याच्यासोबत खेळ करणाऱ्या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू (youth died after snake bite) झाला आहे. ठाण्यातील मुंब्रा (Mumbra Thane) परिसरात ही घटना घडली आहे. सर्पदंशानंतर या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहम्मद शेख (Mohammed Shaikh) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंब्रा परिसरात रहात होता. मुंब्रा परिसरात असलेल्या डोंगराळ भागात पावसामुळे झाडाझुडपात लपलेले साप पाण्याच्या प्रवाहाने उघड्यावर येतात तसेच या भागात डोंगर माथ्यावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर सर्रास दिसून येतो. बोंबला! पुरावा म्हणून गर्लफ्रेंडला पाठवलेल्या PHOTO मुळेच चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल झाली या ठिकाणी मोहम्मद शेख या तरुणाला एक साप दिसला आणि त्याने तो पकडला. सापाला पकडल्यानंतर तो त्याच्यासोबत खेळू लागला. हा सर्व प्रकार मोहम्मद शेख याचे दुसरे मित्र मोबाइल कॅमेऱ्यात शूट करत होते. मोहम्मदने सापाला पकडून तो त्याच्याशी खेळ करत होता या दरम्यान मोहम्मदला स्थानिकांनी फटकारले देखील पण तरीही मोहम्मद काही ऐकत नव्हता. त्याच दरम्यान तीन वेळा मोहम्मदला हा साप चावला. काही वेळाने मोहम्मदने या सापाला जंगलात सोडून दिले. सर्पदंश झाल्याचं मोहम्मदच्या लक्षात आले नाही. मात्र, काही वेळाने मोहम्मदला त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोहम्मदचा मृत्यू झाला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Snake, Thane

पुढील बातम्या