मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इंटेरिअरचं काम थांबवण्यास सांगितल्याचा राग; महिलेला बेदम मारहाण, ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील घटना CCTV मध्ये कैद

इंटेरिअरचं काम थांबवण्यास सांगितल्याचा राग; महिलेला बेदम मारहाण, ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील घटना CCTV मध्ये कैद

ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

CCTV of Woman beaten in Thane society lift: ठाण्यात एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला पुरुषाने केलेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

ठाणे, 5 डिसेंबर : इमारतीत सुरू असलेल्या इंटेरिअरच्या कामात्रा त्रास होत असल्याने दुपारच्या सुमारास बांधकाम करू नका अशी विनंती करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ठाण्यातील (Thane) एका उच्चभ्रू सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका पुरुषाने आणि त्याच्या आईने महिलेला लिफ्टमध्ये मारहाण केली (Thane Woman beaten by man and his mother in lift) आहे. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याा घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Caught in CCTV woman beaten by man in society lift) ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील एका उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडली आहे. सोसायटीतील एका घरात इंटेरिअरचे काम सुरू होते. या घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी दुपारच्या सुमारास काम थांबवण्याची विनंती केली. मात्र, संबंधित इसमाने त्या महिलेचं ऐकून तर घेतलंच नाही उलट तिला मारहाण केली आहे. वाचा : 14 वर्षीय मुलीचं अपहरण करुन दोन जिल्ह्यांत अत्याचार, घटनेने महाराष्ट्र हादरला आई आणि मुलाने मिळून महिलेला केली मारहाण सोसायटीतील सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत दिसत आहे की, पीडित महिला संबंधित व्यक्तीसोबत बोलून लिफ्टमध्ये प्रवेश करते. यावेळी आरोपी व्यक्तीने लिफ्टचा दरवाजा थांबवून ठेवला. तसेच त्यावेळी त्या व्यक्तीची आई सुद्धा लिप्टमध्ये होती. आरोपीच्या आईने हा वाद थांबवण्याऐवजी पीडित महिलेला मारहाण केली. यानंतर आरोपीनेही लिफ्टमध्ये शिरुन महिलेवर हात उचलला. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता याप्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर पीडित महिलेवर प्राथमिक उपचार करुन तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा : 5 वर्षीय मुलावर कुऱ्हाडीने वार करत केले 7 तुकडे; जन्मदात्याच्या अमानुष कृत्याचं कारण वाचून हादराल हरियाणात सून भडकली; सर्वांसमोर सासूला मारहाण हरयाणामधील गुरुग्राममधून एक सुनेने आपल्या सासूला मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यादरम्यान घरातील काही सदस्यही उपस्थित असतानाही सुनेने सासूला कानशिलात लगावली. या वादाचं कारण घरात काम करण्यासाठी महिला ठेवण्यावरुन झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध सासू बऱाच काळापासून घरातील सर्व काम करीत आहे. त्यामुळे आईला त्रास नको म्हणून पीडित महिलेच्या मुलाने घरात काम करणारी बाई ठेवण्यास सांगितलं. मात्र व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर असलेल्या सुनेला हे मान्य नव्हतं. सायबर सिटी गुरुग्राममधील कलयुगातील या सुनेने आपल्या सासूला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कविता जिंदल नावाची महिला पहिल्यांदा आपल्या सासूसाठी अपशब्द वापरले, त्यानंतर तिला मारहाण करू लागले.
First published:

Tags: Cctv, Crime, Thane

पुढील बातम्या