लढत विधानसभेची : ठाणे शहर मतदारसंघ कुणाकडे जाणार?

लढत विधानसभेची : ठाणे शहर मतदारसंघ कुणाकडे जाणार?

भाजप आणि शिवसेनेच्या युतीत जर हा मतदारसंघ भाजपकडे आला तर संजय केळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. ही जागा शिवसेनेकडे गेली तर महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

  • Share this:

ठाणे, 17 सप्टेंबर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत भाजपकडे गेला. 2014 च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तुटल्याने सगळी समीकरणं बदलली.

या निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा भाजपचे संजय केळकर यांनी पराभव केला आणि शिवसेनेला धक्का बसला. राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे नारायण पवार यांचा इथे पराभव झाला होता. आता हे दोन्ही उमेदवार भाजपमध्ये आहेत. त्यामुळेच आघाडीकडे उमेदवार राहिलेला नाही.

2014 नंतर दोन वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेपेक्षा भाजपचे नगरसेवक जास्त संख्येने निवडून आले. त्यामुळेच आता या मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे,असंच म्हणावं लागेल.

ठाणे शहर मतदारसंघात श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय मतदार आहेत. राबोडीसारख्या विभागात मुस्लीम मतदारही आहेत.

महाराष्ट्राचा महासंग्राम : कोपरगावमध्ये रंगतदार लढतीची चिन्हं

भाजप आणि शिवसेनेच्या युतीत जर हा मतदारसंघ भाजपकडे आला तर संजय केळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. ही जागा शिवसेनेकडे गेली तर महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. युती तुटली तर हेच उमेदवार एकमेकांच्या विरोधातही लढू शकतात.

दुसरीकडे आघाडीमध्ये अजून काही स्पष्ट दिसत नाही. एन्काउंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी काही महिन्यांपासून ठाणे शहर मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यांना काँगेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सचिन शिंदे यांनाही पसंती मिळू शकते.

या मतदारसंघात शहरी वस्तीमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. तसंच अतिक्रमणं, पावसाळ्यात तुंबणारं पाणी याही समस्या आहेत. उमेदवारांना या मुद्द्यांवर भर द्यावा लागणार आहे.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

संजय केळकर, भाजप - 70 हजार 884

रवींद्र फाटक, शिवसेना - 58 हजार 296

निरंजन डावखरे, राष्ट्रवादी - 24 हजार 320

======================================================================================

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या