इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू; ठाण्यातील मालकाविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यातील बाळकुम परिसरात इमारतीच्या 20व्या मजल्यावरुन कासव पडल्याने त्याचा मृत्यू झाला

ठाण्यातील बाळकुम परिसरात इमारतीच्या 20व्या मजल्यावरुन कासव पडल्याने त्याचा मृत्यू झाला

  • Share this:
ठाणे, 12 मे: ठाण्यातील (Thane) एका उंच इमारतीच्या 20व्या मजल्यावरून खाली पडून कासवाचा मृत्यू (turtle died) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पशु कल्याण अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर या कासवाच्या मालकावर गुन्हा दाखल (turtle owner booked) करण्यात आला आहे. सुनिष सुब्रमण्यम यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ठाण्यातील कापूरबावडी पोलीस (Kapurbavadi Police Thane) ठाण्यात सदर मालकाविरोधात सोमावारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनिष सुब्रमण्यम हे पशु कल्याण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 1 मे 2021 रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने हेल्पलाईनवर फोन करत सांगितलं की, कोरल बिल्डिंग, बाळकुम येथील इमारतीवरुन पडून कासवाचा मृत्यू झाला आहे. या संबंधितील फोटोजही त्यांना पाठवण्यात आले होते. मुंबई हादरली! आधी बलात्कार मग गळ्यावरून फिरवला सुरा, वांद्र्यात बेवारस पडला होता मृतदेह सुनिष यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हे कासव पाळले होते तो व्यक्ती इमारतीच्या 20व्या मजल्यावर राहतो. त्याने आपल्या घरात Red Eared Slider Turtle प्रजातीचे कासव पाळले होते. या कासवाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने तो राहत असलेल्या घरातून खाली जमिनीवर पडून मृत झाले. म्हणून माझी सदर इसमाविरुद्ध प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1960 कलम 11(1) अ प्रमाणे तक्रार आहे. या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी सदर कासवाच्या मालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published: