Home /News /maharashtra /

Thane: वयोवृद्धाचा लिफ्टखाली आढळला मृतदेह; गेल्या दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Thane: वयोवृद्धाचा लिफ्टखाली आढळला मृतदेह; गेल्या दोन दिवसांपासून होते बेपत्ता

दोन दिवसांपासून बेपत्ता वयोवृद्धाचा लिफ्टखाली आढळला मृतदेह, लिफ्टखाली अडकल्याने मृत्यू

दोन दिवसांपासून बेपत्ता वयोवृद्धाचा लिफ्टखाली आढळला मृतदेह, लिफ्टखाली अडकल्याने मृत्यू

Thane News: लिफ्टखाली अडकल्याने एका वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली आहे.

    ठाणे, 28 मे : ठाण्यातील चंदनवाडी परिसरात (Chandanwadi Thane) लिफ्टखाली एका वयोवृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. नारायण धोंडू बेलोसे असं मृतकाचे नाव आहे. नारायण बेलोसे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि शुक्रवारी लिफ्टखाली त्यांचा मृतदेह (dead body found under lift) आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस (Naupada Police) कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. बुधवारपासून बेपत्ता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नारायण बेलोसे हे चंदनवाडी परिसरातील रायगड आळी येथील जाई अ या इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होते. बुधवारपासून ते बेपत्ता झाले होते. नारायण बेलोसे हे बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाने नारायण बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास लिफ्टच्या ठिकाणाहून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी या प्रकरणाची माहिती नौपाडा पोलिसांना दिली. नौपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासले असता लिफ्टच्याखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वाचा : चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या हाती, CCTV मुळे आरोपींची पोलखोल ठाणे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी यांच्या मदतीने सदर पुरुषाचा मृतदेह लिफ्ट रूममधून बाहेर काढला. हा मृतदेह नारायण बेलोसे यांचा असल्याचं समोर आलं आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. लिफ्टखाली अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्यावर्षी वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली गेल्यावर्षी (जुलै 2021) मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मोठी दुर्घटना घडली होती. इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला. वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली. अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली होती. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Thane

    पुढील बातम्या