• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ठाण्यात रेल्वे तिकिटाऐवजी महिला प्रवाशाला दिल्या अर्वाच्च भाषेत शिव्या, रेल्वे कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

ठाण्यात रेल्वे तिकिटाऐवजी महिला प्रवाशाला दिल्या अर्वाच्च भाषेत शिव्या, रेल्वे कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Railway Employee used abusing language: ठाण्यात एका महिला प्रवाशासोबत रेल्वे कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:
ठाणे, 8 जून: राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी झाल्याने आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे. लॉकडाऊन (Lockdown)मुळे घरातच बसलेली जनता आता कामानिमित्त घराबाहेर पडू लागली आहे. मात्र याच दरम्यान अनेकजण नियमांचे उल्लंघन करत रेल्वे प्रवास करतात. परंतु अशा व्यक्तींशी आणि विशेषतः महिलांशी अत्यंत असभ्य वर्तन केल्याचा निंदनीय प्रकार आज ठाणे रेल्वे स्थानकात (Thane Railway Station) पहायला मिळाला. ठाणे शहरात राहणारी ही महिला प्रवासी आपल्या वाशी येथील खाजगी कंपनीत कामानिमित्त जाण्यासाठी निघाली होती. यावेळी त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात तिकिट काढण्यासाठी तिकिटघर गाठलं. लोकलची सेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू न करण्यात आलेली नाहीये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे ओळखपत्र विचारले. त्यावेळी त्यांचे खाजगी कंपनीचे ओळखपत्र पाहून रेल्वे कर्मचाऱ्याने त्यांना तिकिट देण्यास नकार दिला. कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाला झाडाला बांधले; अंगावर लघुशंका करत मारहाण, जळगावातील VIDEO VIRAL तिकिट न मिळाल्याने पीडित महिलेने आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी सदर रेल्वे कर्मचाऱ्याने आपले पेन सदर महिलेला फेकून मारण्याचा प्रयत्न केला असता, पेन खिडकीवरील काचेला लागून आतच पडला. यानंतर संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिकिट घरातून बाहेर येत संबंधित महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि सर्वांसमोर तिचा अपमानही केला. संपूर्ण घडलेला प्रकार तेथे उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांच्या समोरच घडला. रेल्वे कर्मचाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने या पीडित महिलेने या रेल्वे कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधीत महिलेने आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले तसेच खिडकी क्रमांकही सांगितला तरिही पोलिसांनी कर्मचाऱ्याची ओळख पटली नसल्याचे दाखवत पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे पोलीस रेल्वे कर्मचाऱ्याला पाठिशी घालत असल्याचं बोललं जात आहे.
Published by:Sunil Desale
First published: