मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /टेम्पोमधील गोण्या पोलिसांनी उचकटल्या आणि गुन्ह्याचा झाला पर्दाफाश!

टेम्पोमधील गोण्या पोलिसांनी उचकटल्या आणि गुन्ह्याचा झाला पर्दाफाश!

जवळपास 1 कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती.

जवळपास 1 कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती.

जवळपास 1 कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती.

ठाणे, 8 जानेवारी : राज्यात मद्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे. त्यातच कोरोना काळात सुरुवातीला काही महिने मद्य व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. अजूनही म्हणावी तशी वाहकूत सुरळीत न झाल्याने मद्य विक्री व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. म्हणून जास्त फायदा मिळवण्यासाठी दमणच्या टॅक्सी फ्री मद्याची मोठ्या प्रमाणात देशभर तस्करी केली जाते. अशातच तब्बल जवळपास 1 कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती. याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ अधिकारी अनिल राठोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दमण येथून आलेल्या एका ट्रकला पाठलाग करुन कसारा रोडवर पकडले.

सुरुवातीला आपली माहिती चुकीची होती की काय? असा धक्का अनिल राठोड आणि त्यांच्या टीमला बसला. कारण माहिती मिळाल्या नुसार ज्या ट्रकला अडवून त्याची झडती सुरु होती त्या ट्रकमध्ये नायलॉनच्या धाग्यांच्या गोण्या होत्या. पण त्या गोण्या काढून पाहिल्यावर गोण्यांच्या खाली जवळपास 425 बॉक्स दमण मद्याचे आढळून आले. जसं जसे दारुचे बॉक्स बाहेर काढले जात होते तसं तसे विविध प्रकारचे मद्य अधिकाऱ्यांच्या हाती लागत होते. मिळालेल्या मुद्देमालाची अंदाजे मोजदाद ही जवळपास 1 कोटी रुपयांच्या घरात आहे.

याप्रकरणी ठाणे उत्पादन शुल्क विभागाने टेम्पोच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. अटक केलेला ड्रायव्हर देखील चतूर असून तो अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याचे तपासात समोर आले आहे. दमणचे मद्य मध्यप्रदेश येथे घेवून जात होतो. हे मद्य भिवंडीमार्गे घेवून गेल्यास पोलीस पकडत नाहीत असं ड्रायव्हर फिरवून फिरवून सांगत होता. पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता हे दमणचे मद्य गुजरात राज्यात जिथे मद्य विक्रीला बंदी आहे तेथे तस्करी केले जाणार होते. उत्पादन शुल्क विभागाची ही आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप, कोकण विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, संचालिका उषा वर्मा, ठाणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून ही कारवाई करणारे अनिल राठोड आणि त्यांच्या टीमचे राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत कौतुक केले जात आहे.

First published:

Tags: Thane (City/Town/Village)