ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी, चाईल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्या टोळीला अटक

ठाणे पोलिसांची मोठी कामगिरी, चाईल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्या टोळीला अटक

गेल्या काही दिवसांमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीची मागणी सातत्याने वाढत आहे

  • Share this:

ठाणे, ०३ ऑगस्ट- ठाणे पोलिसांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर चाईल्ड पॉर्नोग्राफी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी मुंबईसह देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन बंदी घातलेल्या चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ व्हायरल करायचे. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, या ग्रुपमधील लोक हे अल्पवयीन आहेत किंवा १८ ते २५ वयोगटातील आहेत. या ग्रुपमध्ये २५० हून जास्त मेंबर्स आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीची मागणी सातत्याने वाढत आहे. यातून तगडी कमाईही केली जाते. आठ जणांनी मिळून हा ग्रुप तयार केला होता. ठाणे पोलिसांनी या आठही आरोपींना अटक केले आहे.

भारतात चाईल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. पण तरीही भारतात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ अनैतिक पद्धतीने डाऊनलोड केले जातात, शिवाय व्हॉट्सअपवर शेअर करुन मोठी कमाई केली जाते. ठाणे पोलिसांच्या मते, पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एक आरोपी ही हॅकर आहे. तसेच डार्कनेटवरुन तो अश्लिल व्हिडिओ डाऊनलोट करतो आणि ग्रुपच्या मुख्य व्यक्तीला हे व्हिडिओ पुरवण्याचे काम करतो. या ग्रुपच्या तीन मुख्य सदस्यांनी चार व्हॉट्सअप ग्रुप बनवले असून त्यात हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.

या चार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉलेजला जाणारी अनेक तरुण मुलं आहेत. तसेच अल्पवयीन, कमी शिकलेली मुलंही या ग्रुपमध्ये आहेत. तसेच मानसिक विकृती असलेले ३० वर्षांपर्यंतची मुलंही आहेत. येत्या काळात चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडिओच्या आहारी गेलेल्या मुलांची चौकशी ठाणे पोलीस कऱणार आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीवर आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाईत ठाणे पोलिसांची ही सर्वात मोठी कार्यवाई मानण्यात येते. आतापर्यंत मीरा रोड, भाईंजर, वसई, विरार या ठिकाणांहून पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. तर ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेची एक टीम नाशिकमध्ये तीन गुन्हेगारांच्या शोधात आहेत.

First published: August 3, 2018, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading