ठाणे, 14 ऑगस्ट : ठाणे पोलीस (thane police) दलातील अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. त्यानंतर आता ठाणे पोलिसांच्या शिरपेचात मनात तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाचे समजले जाणारे राष्ट्रपतींचे पोलीस पदक (President Police Medal) जाहीर झाले आहे.
परमवीर सिंग (parambir singh), सचिन वाझे (sachin vaze) प्रकरण असो अथवा ठाण्यातील डान्सबार प्रकरण असो यासारख्या अनेक प्रकारणामुळे ठाणे पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणांमध्ये अनेक पोलीस निलंबित झाले आहेत. तर अनेकांना बडतर्फ करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील अनेक वेळा प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव
मात्र, आता ठाणे पोलिसांच्या गौरवाची बातमी समोर अली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये नारपोली वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक कल्याण नारायणजी घेटे, ठाणे आयुक्तालय विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव रामचंद्र जाधव, ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज मानसिंग पवार, ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदा हरिभाऊ भिल्लारे आदींचा पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.पोलीस दलात गुणवत्ता पूर्वक सेवा बजावल्या बद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमध्ये आढळले फटाके
दरवर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत आणि गंभीर गुन्हे घडतात. या गुन्ह्यांची उकल करण्याकरता पोलीस दिवस-रात्र मेहनत घेत आहे उपलब्ध मनुष्यबळ आणि सोयी सुविधा यांचा सहाय्याने ठाणे पोलीस जे काम करत आहे ते खरंच वाखाणण्या जोगे आहे. एवढंच नाही तर इतर राज्यात जाऊन ठाणे पोलिसांच्या जवानांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या देखील आवळत आहेत. यामुळे सदैव ठाणे पोलिसांचा गौरव केला जातो त्यात अशा पद्धतीने पुरस्कार मिळाल्याने ठाणे पोलिस दलाला एक नवीन पूर्वक मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.