मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाणेकरांसाठी खूशखबर ! 500 स्केअर फुट पर्यंतच्या घरांना करमाफी

ठाणेकरांसाठी खूशखबर ! 500 स्केअर फुट पर्यंतच्या घरांना करमाफी

ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

ठाण्यात जे नागरीक 500 स्केअर फुट पर्यंतच्या घरांमध्ये वास्तव्यास असतील त्यांच्यासाठी एक खूशखबरी आहे. या नागरिकांसाठी ठाणे महापालिकेने करमाफी केली आहे.

  • Published by:  Chetan Patil

निखिल चव्हाण, प्रतिनिधी

ठाणे, 18 नोव्हेंबर : ठाणे महापालिकेने (TMC) ठाणेकरांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ठाण्यात जे नागरीक 500 स्केअर फुट पर्यंतच्या घरांमध्ये वास्तव्यास असतील त्यांच्यासाठी एक खूशखबरी आहे. या नागरिकांसाठी ठाणे महापालिकेने करमाफी (Tax exemption) केली आहे. ठाणे महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्षीयांच्या संमतीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला निर्णय. या निर्णयाने ठाण्यातील सर्वसामान्य कुटुंबाना मोठा दिलासा (Relief) मिळणार आहे.

शिवसेनेकडून अखेर वचनपूर्ती

खरंतर शिवसेनेने 2017 साली ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत करमाफीचं आश्वासन दिलं होतं. विशेष म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये हा मुख्य मुद्दा होता. पण सत्तेत निवडून आल्यानंतर पाच वर्ष होत आली असतानाही करमाफीबाबत निर्णय झाला नव्हता. अखेर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची पूर्ती करण्यात आली, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. दुसरीकडे काही जणांकडून 'लेट आलं, पण थेट आलं', अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.

हेही वाचा : गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, कधीही अटक होण्याची शक्यता

निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ठाणेकरांना आश्वासन दिलं होतं की, 500 चौरस फुटांच्या घराचे टॅक्स माफ करु. याबाबत यापूर्वीच आम्ही निर्णय घेणार होतो. पण महापालिकेची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली होती. महसुली उत्पन्न कमी झाल्याने आणि कोरोनाचा खर्च वाढल्याने आम्हाला तो निर्णय तात्काळ एक ते दीड वर्षापूर्वी घेता आला नाही. पण आज आम्ही सभागृहाने हा ठराव केला आहे. यासाठी नगरविकास खात्याची परवानगी लागणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदेशान्वे आम्ही आज तो ठराव केला आहे. हा ठराव आम्ही शासनाकडे पाठवू. तो ठराव शासन मंजूर करेल, अशी आशा आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात जे नुकसान होणार आहे त्याबाबत शासन आम्हाला मदत करेल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

First published: