• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • फेरीवाल्याने केलेला हल्ला पिंपळेंवर नाही तर प्रशासनावर, पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत दिला 'हा' इशारा

फेरीवाल्याने केलेला हल्ला पिंपळेंवर नाही तर प्रशासनावर, पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत दिला 'हा' इशारा

फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत ठाणे महानगरपालिकेतील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी यांनी आज काम बंद आंदोलन केले आहे.

  • Share this:
ठाणे, 1 सप्टेंबर : सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (TMC Assistant Commissioner Kalpita Pimple) आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे (Security Guard Somnath Palve) यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करत ठाणे महानगरपालिकेतील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (TMC employee) यांनी आज काम बंद आंदोलन केले. कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला प्रशासनावर झालेला हल्ला आहे असं म्हणत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या आंदोलनात ठाणे महानगरपालिकेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी सामील झाले असून आज ठाणे महानगरपालिकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी विशेष करून महिला अधिकारी जीव धोक्यात टाकून काम करत असतात, अशा वेळेस त्यांची सुरक्षा करणे गरजेचे आहे. याकरता अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. "काळजी घ्या, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू" राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द कल्पिता पिंपळे यांच्याप्रमाणेच यापूर्वी देखील ठाण्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. यातील सर्वात जास्त हल्ले हे फेरीवाल्यांकडूनच करण्यात आलेले आहेत. यामुळेच जर हे असंच सुरू राहिलं तर एखादा दिवस फेरीवाल्यांचा हल्ला एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे अशा फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याच बरोबरीने कारवाई करायला जाताना पोलीस सुरक्षा सक्तीची करावी असे देखील बागणी यावेळी करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचे सचिव अशोक बुरपुल्ले आणि अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अशा पद्धतीचा हल्ला पुन्हा होऊ नये झाल्यास ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी त्याविरोधात तीव्र पाऊल उचलतील असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला आहे. याच घटनेने प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली आणि हल्लेखोर अमरजीत यादव वर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून असं कृत्य करण्यास पुन्हा कोणी धाडस करणार नाही अशी मागणी देखील यावेळेस या शिष्टमंडळाने केली.
Published by:Sunil Desale
First published: