सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधानंतरही बसच्या तिकीटदरात होणार मोठी वाढ?

सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधानंतरही बसच्या तिकीटदरात होणार मोठी वाढ?

TMT बस सेवेच्या तिकीट दरात 20 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने गेल्या वर्षी फेटाळून लावला होता. पण यंदा पुन्हा तो ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

ठाणे, 12 फेब्रुवारी : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाड्यांच्या तिकीट दरात 20 टक्के वाढ करण्याचा प्रशासनचा प्रस्ताव आहे. महापालिकेवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने गेल्या वर्षी भाडेवाढ फेटाळून लावली होती. TMT च्या तिकीटदरात 20 टक्के वाढ वरू नये अशी शिवसेनेची भूमिका होती. पण गेल्या वर्षी प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढ सुचवण्यात आली. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्के वाढ करण्याची घोषणा प्रशासनाने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे परिवहन समितीमधील सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर भाडेवाढ लागू करण्यासाठी आग्रही असलेल्या प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मांडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळीही सत्ताधारी शिवसेनेकडून त्यास विरोध झाला होता. येत्या आठवडाभरात परिवहन उपक्रमाचा नवा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यामध्ये गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बस भाडेवाढ प्रस्तावित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

या प्रस्तावासाठी प्रशासन यापूर्वीही आग्रही होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

नाशिकमधील महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, नवी माहिती समोर

बेस्ट उपक्रमाने गेल्यावर्षी भाडेकपात केल्याने टीएमटीच्या प्रवासीसंख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. टीएमटीचे दैनंदिन उत्पन्न जवळपास दोन ते तीन लाखांनी कमी झाले आहे. त्यातच घोडबंदर येथे मेट्रोच्या कामामुळे कोंडी होत असल्याने या भागातील ३० टक्के बसफेऱ्या कमी झाल्या असून त्याचाही परिणाम उत्पन्नावर होत आहे. टीएमटीने बसच्या तिकीट दरात भाडेवाढ लागू केली, तर उर्वरित प्रवासी बेस्टच्या स्वस्त प्रवासाकडे वळण्याची शक्यता आहे.

16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टीएमटी भाडेवाढीचा प्रस्ताव अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने तो फेटाळून लावला होता. यंदाच्या वर्षांत कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा भाडेवाढ प्रस्तावित केली तर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तसेच मुंबईत शिवसेनेची सत्ता असून त्यांनी बेस्टच्या भाडय़ात मोठी कपात केली आहे. ठाण्यात शिवसेनेने अद्याप असा निर्णय घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2020 09:14 PM IST

ताज्या बातम्या