मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सेलिब्रेटी लस प्रकरण; चौकशीत धक्कादायक माहिती उघड, News18 लोकमतच्या हाती चौकशी अहवाल

सेलिब्रेटी लस प्रकरण; चौकशीत धक्कादायक माहिती उघड, News18 लोकमतच्या हाती चौकशी अहवाल

Thane Celebrity vaccine controversy: अभिनेत्री मीरा चोपडा आणि सौम्या टंडन यांच्यासह अनेकांनी बोगस आयडी तयार करून लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Thane Celebrity vaccine controversy: अभिनेत्री मीरा चोपडा आणि सौम्या टंडन यांच्यासह अनेकांनी बोगस आयडी तयार करून लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Thane Celebrity vaccine controversy: अभिनेत्री मीरा चोपडा आणि सौम्या टंडन यांच्यासह अनेकांनी बोगस आयडी तयार करून लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठाणे, 3 जून: ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) लसीकरण केंद्रांवर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने लसीकरण (Vaccination with bogus documents) केले जात असल्याचा खुलासा न्यूज18 लोकमतने गेल्या आठवड्यात केला. त्यानंतर या प्रकरणाची ठाणे मनपाने चौकशी समिती (TMC inquiry committee) नेमली. या चौकशी समितीचा अहवाल आता आला असून त्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ठाणे मनपाचा हा चौकशी अहवाल न्यूज18 लोकमतच्या हाती लागला असून त्यात काय म्हटलं आहे पाहूयात.

News 18 लोकमतच्या हाती ठाणे मनपा चौकशी समितीचा अहवाल

डॉ विश्वनाथ केळकर समितीच्या चौकशीतील ठळक मुद्दे

- ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. वर गंभीर ठपका

- चौकशी समिती समोर ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. कोणीही हजर राहिले नाही

- ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ने चौकशी समितीला जुमानले नाही

- डॉक्टर नाजनीन सय्यद, डॉ. शबाना आझमी, डॉ. हसन अहमद , डॉ. खालिद शेख, डॉ. मोहम्मद अय्याज या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठेवले ठपके

पुढील व्यक्तींना बनावट ओळखपत्र बनवल्याचा चौकशी समितीचा अहवाल

- डॉ. खालिद शेख

- डॉ. नाजनीन सय्यद

- डॉ. शबाना आझमी

मीरा चोपडाच नाही तर 21 श्रीमंतांच्या पोरांनी सुद्धा घेतली लस!

पुढील व्यक्तींनी कागदपत्रे बनावट आहेत हे माहित असून सुद्धा लस दिली

- डॉ. मोहम्मद अय्याज

- डॉ. हसन अहमद

मिरा चोपडा आणि सौम्या टंडन या दोन अभिनेत्रींसह एकूण 21 जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे लस घेतल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून उघड झालं आहे.

चौकशी समितीने केलेले गंभीर आरोप

- बनावट ओळखपत्रे बनवणे

- कागदपत्रे बनावट आहेत हे माहित असुन देखील लस देणे

- शासकीय नियमांचा भंग करण्यात आलाय

- फौजदारी गुन्हा करण्यात आलाय

- गुन्हेगारी प्रवृत्तीने जाणीवपुर्वक काम करण्यात आले आहे

चौकशी केल्यानंतर डॉक्टर विश्वनाथ केळकर चौकशी समितीने पुढील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. 34, 107, 110, 120 B - गुन्हेगारी कट रचणे, 405 - अन्यायाची अफरातफर, 408, 409, 415 416 420 - फसवणूक करणे, 463 बोगस कागदपत्रे बनवणे, 464,466,470,471,511

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Thane