मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्यातील व्यक्तीचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन; स्मशानभूमीत केक कापून पाहुण्यांना पार्टी, सांगितलं खास कारण

ठाण्यातील व्यक्तीचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन; स्मशानभूमीत केक कापून पाहुण्यांना पार्टी, सांगितलं खास कारण

फाईल फोटो

फाईल फोटो

गौमत यांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात मोहनी स्मशानभूमीत हे वाढदिवसाचे हे आगळेवेगळे सेलिब्रेशन केले. वाढदिवस साजरा करण्यासाठी 40 महिला व मुलांसह एकूण 100 पेक्षा अधिक पाहुणे आले होते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे 24 नोव्हेंबर : लग्न समारंभ किंवा वाढदिवस साजरा करताना काहीतरी हटके करण्याचा ट्रेंड सध्या वाढत चालला आहे. अनेकजण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, मोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करतात. तर कुणी घरात केक कापून कुटुंबीयांसोबत वाढदिवसाचा आनंद घेतात. पण महाराष्ट्रातील एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत जाऊन केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे वाढदिवसासाठी आलेल्या 100 पाहुण्यांनी केक व बिर्याणीचा आस्वादही घेतला. समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध संदेश देण्यासाठी या व्यक्तीने स्मशानभूमीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, गौतम रतन मोरे यांनी 19 नोव्हेंबर रोजी त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने गौमत यांनी शनिवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात मोहनी स्मशानभूमीत हे वाढदिवसाचे हे आगळेवेगळे सेलिब्रेशन केले. वाढदिवस साजरा करण्यासाठी 40 महिला व मुलांसह एकूण 100 पेक्षा अधिक पाहुणे आले होते. या सर्वांनी स्मशानात वाढदिवसाची पार्टी साजरी केली. केक कापत असलेला एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऐकावं ते नवलच! समुद्रात पडलेला आयफोन 1 वर्षाने सापडला, बटण दाबताच घडला 'चमत्कार'

या संदर्भात बोलताना गौतम मोरे म्हणाले की, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आणि महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्मशानात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र दाभोलकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून मोठं अभियान सुरू केलं होतं. याच अभियानाला पुढे नेण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मशानभूमीत भूत-प्रेत वैगेरे काही नसतं, हे दाखवून देण्यासाठी तिथं वाढदिवस साजरा करण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत खारीचा वाटा

स्मशानभूमी अशुभ असल्याचं आजही मानलं जातं. वंशपरंपरागत अनेक संकल्पना समाजात चालत आल्या आहेत. यात पिंपळ, वडाचं झाड, ओढा, विहीर, स्मशानभूमी आदी ठिकाणी भूतांचं वास्तव्य असतं असं अनेकदा सांगितलं जातं. त्यामुळे अबालवृद्धांसह सर्वचजण तिकडे जाणं टाळतात. या संकल्पनेला छेद देण्यासाठी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे सर्व मित्रमंडळी व नातेवाइकांनी या अनोख्या वाढदिवसाला त्यांची उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला असल्याचं मोरे म्हणाले.

सिंह आहे का पाळलेली मांजर? Video पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास

समाजातून अंधश्रद्धा नाहीशी करण्याचा प्रयत्न

आजकाल उच्चशिक्षित तरुण-तरुणीही अंधश्रद्धेला बळी पडत असतात. अंधश्रद्धेपोटी बकरं, कोंबडं यांचा बळी दिला जातो. भूतबाधा, भानामती यावरही अनेकांचा विश्वास आहे. यातूनच अनेकदा लोकांची फसवणूक होत असते. त्यामुळे या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेऊन चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाऊ नये, हा विचार करून स्मशानात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचंही मोरे यांनी सांगितलं.

First published:

Tags: Birthday, Viral news