Home /News /maharashtra /

खाडीच्या चिखलात अडकली Toyota Car..! 6 जणांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

खाडीच्या चिखलात अडकली Toyota Car..! 6 जणांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद

ठाण्यात (Thane) आज सकाळी एका कार अपघात झाला. (car accident) या अपघाताचा रेस्क्यूचा थरार पाहायला मिळाला.

    ठाणे, 17 जानेवारी: ठाण्यात (Thane) आज सकाळी एका कार अपघात झाला. (car accident) या अपघाताचा रेस्क्यूचा थरार पाहायला मिळाला. ठाणे शहरात आज सकाळी खाडीच्या पाण्यामध्ये मोठा अपघात घडला. टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner Car) कारचा हा अपघात झाला. कारनं जाणाऱ्या 6 जणांसह बाळकुम खाडीच्या चिखलात ही गाडी जाऊन अडकली. टोयोटा फॉर्च्युनर कार खाडीच्या चिखलात अडकली. त्यानंतर बचाव पथकाला याची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन या 6 जणांचं रेस्क्यू करुन वाचवलं आहे. Amravati Breaking: शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला ठाणे शहरातील बाळकुम खाडी येथे पहाटे मोठा अपघात झाला. टोयोटा फॉर्च्युनर कारने जाणारे 6 जण बाळकुम खाडीत अडकले. त्यांची कार खाडीच्या चिखलात जाऊन अडकली. याची माहिती मिळताच रेस्क्यू टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेस्क्यू टीमनं कारमध्ये अडकलेल्या सहा जणांची सुखरुप सुटका केली आहे. रोहित नायर, हेनरी जॉन, ईश्वरी खैरे, पूजा रॉट्री आणि अश्विनी कुमार अशी कारमध्ये अडकलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबुर भागात राहणारे सहाजण मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी कोलशेत खाडी येथे आले होते. यावेळी कारसमोर एक कुत्रा आल्यानं नियंत्रण सुटलं आणि कार खाडीच्या चिखलात अडकली. सुमारे अडीच तासांनी कार चिखलातून बाहेर काढली. सर्व सहाजण सुखरूप आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Thane

    पुढील बातम्या