ठाणे लोकसभा निवडणूक : राजन विचारे VS आनंद परांजपे, शिवसेना गड राखणार का?

ठाणे लोकसभा निवडणूक : राजन विचारे VS आनंद परांजपे, शिवसेना गड राखणार का?

ठाण्यावर अनेक वर्षं शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच इथून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली. या लढतीत शिवसेना गड राखणार का, याची चर्चा आहे.

  • Share this:

ठाणे, 15 मे : शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं म्हटलं जातं. ठाण्यावर अनेक वर्षं शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच इथून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली.

शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे हे 1996 पासून ते 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आले. त्यांच्या निधनानंतर 2008 ला लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी त्यांचा मुलगा आनंद परांजपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयीही झाले. त्यानंतर मात्र आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

मागच्या निवडणुकीत सेना विजयी

२009 च्या निवडणुकीत संजीव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी ठाणे जिंकलं पण त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मात्र राजन विचारे यांचा विजय झाला आणि ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडे आली.

यावेळी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद परांपजे यांना उमेदवारी दिली आणि राजन विचारे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली. ठाण्यात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झालं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना 5 लाख 95 हजार 364 मतं मिळाली तर संजीव नाईक यांना 3 लाख 14 हजार 65 मतं मिळाली. मनसेचे अभिजीत पानसे त्यावेळी तिसऱ्या स्थानावर होते.

सेनेचा गड सेनेकडे?

ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाइंदर, ठाणे, बेलापूर या विधानसभा मतदारसंघावंर भाजपचं वर्चस्व आहे. ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी तर पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. आता यावेळी राजन विचारे शिवसेनेचा गड राखतात का याची इथे जोरदार चर्चा आहे.

===========================================================================

VIDEO: कोण खरं काय खोटं? भाजप-तृणमूलकडून व्हिडीओ ट्विट

First published: May 15, 2019, 4:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading