ठाणे, 26 जानेवारी : ठाणे शहरातील हिरानंदानी मेडोज येथील परिसरात मोठी आग (Thane Fire) लागली आहे. मैदानातील गवताला ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र रहिवासी भागापासून जवळच ही आग असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झालं आहे.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसर हाय प्रोफाईल परिसर म्हणून ओळखला जातो. याच परिसरात असणाऱ्या मैदानावरील सुकलेल्या गवताला आग लागली आणि काही क्षणांतच ही आग मैदानावरील इतर भागात पसरली. आग आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या एक जम्बो टँकर घटनास्थळी आणण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापनाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
(ही बातमी अपडेट होत आहे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Thane (City/Town/Village)