लढत विधानसभेची : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदेंना आव्हान कुणाचं?

लढत विधानसभेची : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदेंना आव्हान कुणाचं?

2014 ला मोदी लाट असतानाही एकनाथ शिंदे इथे एक लाख मतांनी इथून निवडून आले. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे असं समीकरणच बनलं आहे.

  • Share this:

ठाणे, 17 सप्टेंबर : ठाण्यातला कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ हा बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे. 2009 साली हा मतदारसंघ ठाणे शहर मतदारसंघातून वेगळा झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदेच इथले आमदार आहेत.

2014 ला मोदी लाट असतानाही एकनाथ शिंदे इथे एक लाख मतांनी इथून निवडून आले. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे असं समीकरणच बनलं आहे.

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी राजकीय विरोधकच शिल्लक ठेवले नाहीत. युती तुटली तर भाजपकडून शहर अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण हे इथून इच्छुक आहेत.या मतदारसंघात सध्यातरी आघाडीकडून लढण्यासाठी एकही मोठा उमेदवार नाही. काँग्रेसकडून इथे मनोज शिंदे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

भाजपप्रवेश लांबला कारण... नारायण राणेंनी केला मोठा खुलासा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना या मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे अजूनही इथे शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. या स्थितीत सध्या तरी शिवसेनेचा हा बालेकिल्ला मजबूत आहे, असंच म्हणावं लागेल.

एकनाथ शिंदे राज्यातले मोठे नेते असले तरी इथे गेल्या पाच वर्षांत एकही मोठा प्रकल्प झालेला नाही. अनेक जुन्या, धोकादायक आणि अनधिकृत इमारती इथे आहेत. इथे असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सॅटिस दोन हा प्रकल्प इथे राबवला जाणार आहे. त्या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकतात.

कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणूक निकाल 2014

एकनाथ शिंदे, शिवसेना - 1 लाख 316

अ‍ॅड. संदीप लेले, भाजपा - 48 हजार 447

==============================================================================================

VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading