जितेंद्र आव्हाड समर्थकांवर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

जितेंद्र आव्हाड समर्थकांवर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

तरुणाला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

  • Share this:

ठाणे, 9 एप्रिल : ठाण्यातील अनंत करमुसे या तरुणाला करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. अटक केलेले पाचही जण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. या सर्वांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली आहे.

ठाण्यातील एका इंजिनिअर तरुणाने मारहाणीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप करत आव्हाड यांच्या माणसांनी त्यांच्यासमोर मला मारहाण केल्याचा आरोप केला होता. तसंच पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मारहाणीचा आरोप आणि आव्हाडांचं उत्तर

'जितेंद्र आव्हाड यांच्या माणसांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली. त्यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाड हे तिथे होते,' असा आरोप पेशाने अभियंता असलेल्या तरुणाने केला. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत मी त्या तरुणाला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केले धमकीचे फोटो

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग पकडला. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करा, अशी मागणी केली. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं दु:ख जाहीरपणे मांडलं आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंसमोरील सर्वात मोठं राजकीय संकट दूर, आमदाराकीच्या पेचावर असा काढला मार्ग

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसंच आपल्या भावनाही मांडल्या आहेत. 'हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली...कुणी केली... हत्या करण्याचे ठरले...कोण होते त्यात...असो...आईचे आशीर्वाद...पोलीस कारवाई करतील यावर,' असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 3:21 PM IST

ताज्या बातम्या