Home /News /maharashtra /

डोंबिवलीतील 'त्या' लग्नात उपस्थितांची आता चौकशी होणार, पालकमंत्र्यांचा इशारा

डोंबिवलीतील 'त्या' लग्नात उपस्थितांची आता चौकशी होणार, पालकमंत्र्यांचा इशारा

डोंबिवलीमध्ये 'त्या' झालेल्या लग्नात उपस्थित असलेल्यांची आता चौकशी होणार आहे, असा इशारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

कल्याण, 3 एप्रिल: डोंबिवलीमध्ये 'त्या' झालेल्या लग्नात उपस्थित असलेल्यांची आता चौकशी होणार आहे, असा इशारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या लग्नातूनच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा जास्तीचा प्रसार झाला आहे. परदेशात आणि धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या नागरिकांनी खरी माहिती प्रशासनाला दयावी, असं आवाहन देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. डोंबिवलीमध्ये 'त्या' झालेल्या लग्नात उपस्थित असलेल्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कल्याण-डोंबिवलीत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय साहित्य करता निधी दिला जाईल आणि तो कमी पडणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हेही वाचा..संचारबंदीत भाजपच्या माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर काठ्यांचा प्रसाद या बैठकीला कोकण विभाग आयुक्त शिवाजी दौड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक आकडे,खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजू पाटील आदी जण उपस्थित होते. दरम्यान, डोंबिवलीतील म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद तर जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे 19 मार्च रोजी विवाह समारंभ पार पडला होता. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या लग्नातून कोरोनाचा जास्त संसर्ग पसरण्याचा संशय व्यक्त होत आहे. हेही वाचा.. कोरोनाशी लढा : केंद्राने राज्यांना दिले 17287 कोटी, मिळणार SDRMF चा पहिला हप्ता लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना लागण झाली आहे याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. मात्र पोलिसांनी या लग्नाला उपस्थिती दिलेल्यांची यादी तयार केली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी लग्नाचे आयोजक आणि लग्नासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हेही वाचा..संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित 88 नव्या रुग्णांची नोंद झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 490 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे,. त्यातील 54 रुग्ण मुंबई येथील असून 9 जण अहमदनगरचे ,11 पुणे येथील आहेत. याशिवाय 9 जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. 2 रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी 1 रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 490 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. धक्कादायक म्हणजे शुक्रवारी राज्यात 4 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Dombivali, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या