Home /News /maharashtra /

ठाण्यात गुंडांचा हैदोस; फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणावर जीवघेणा हल्ला, घटना CCTVत कैद

ठाण्यात गुंडांचा हैदोस; फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणावर जीवघेणा हल्ला, घटना CCTVत कैद

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे वागळे पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दखल करून तिघांना अटक केली आहे.

ठाणे, 13 मे : ठाण्यात नेमके सुरु आहे तरी काय? असा प्रश्न निर्माण झालाय. जर ठाण्यात लाॅकडाऊन (Lockdown in Thane) आहे, जमावबंदी आहे तर मग अस असतानाही ठाण्यात गुंडाचा हैदोस (goons attack in Thane) काही कमी होत नाहीये. कधी नंग्या तलवारी नाचवत दोन टोळ्या भिडतात तर कधी या ना त्या कारणाने ठाण्यात मारामारी होतायेत. एकदा तर गोळीबार देखील केला गेलाय. असं असताना आठवड्यापूर्वी केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ३ जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण (auto driver beaten) केल्याची घटना घडलीये. या हल्ल्यात रिक्षाचालक संतोष दुबे (Santosh Dubey) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद (incident caught in CCTV) झाला आहे. वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशर आयटी पार्कच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टॅंडवर रात्री 2 च्या सुमारास मयूर शेट्टी आणि त्याचे 2 साथीदार आले त्यांना अचानक संतोष दुबे याला मारहाण करायला सुरुवात केली. सुरुवातीला संतोषला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली पण काही वेळातच तिघांपैकी एकाने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढून संतोषवरवार करायला सुरुवात केली आणि यामुळे घाबरलेला संतोष पळू लागला तोच त्याच्या पाठलाग करत त्याच्यावर धार धार शस्त्राने वार केले जात होते. वाचा: इमारतीच्या 20व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू; ठाण्यातील मालकाविरोधात गुन्हा दाखल वार करणा-या तरुणाने जोरात शस्त्र फिरवले मात्र संतोषने तो वार चुकवला नाही तर संतोषच्या गळ्यावर घाव बसला असता आणि संतोषचा जागच्या जागीच मृत्यू झाला असता. संतोषने तो वार हुकवला मात्र संतोषच्या तोंडावर ते शस्त्र लागल्याने त्यामुळे संतोष गंभीर जख्मी झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे वागळे पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दखल करून तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मयूर शेट्टी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांचा समावेश आहे. आठवड्यापूर्वी रिक्षाच्या भाड्यावरून तक्रारदार संतोष दुबे याने मयूर शेट्टी याला स्टेशन परिसरात धक्काबुक्की केली होती. हाचराग मनात धरून बुधवारी मध्यरात्री मयुरने संतोषवर प्राणघातक हल्ला केला आहे. खरं तर ठाण्यात गल्ली बोळात असे अनेक भाई आहेत जे शुल्लक कारणांवरून एकमेकांचा जीव घ्यायला देखील कमी करत नाहीत. आता तर ठाण्यात अशा भाईंचा सोशल मीडियावर ट्रेंड बनत चाललाय एखाद्या गुन्ह्यांत अटक झाली की गॅंग बनवायची आणि टोळीने फिरत आपली दहशत माजवून लोकांना घाबरवायचे असे प्रकार आता ठाण्यात सर्रास घडू लागले आहेत. ठाण्यात हे प्रकार असेच वाढत राहिले तर एक दिवस मोठ्या गॅंगवारचे ठाणेकर साक्षीदार होतील यांत काही शंका नाही पण त्यामुळे ठाण्यात राहणा-या शांतताप्रिय नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळेच ठाण्यात नेमकं सुरु आहे तरी काय? या प्रश्ना सोबतच अशा गुंडावर ठाणे पोलिसांचा वचक थोडा तरी उरलाय का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Cctv footage, Crime, Thane

पुढील बातम्या