मुंबईत पोपट आणि दुर्मिळ कासवांची तस्करी, सौदा सुरू असतानाच वनविभागाची धाड

मुंबईत पोपट आणि दुर्मिळ कासवांची तस्करी, सौदा सुरू असतानाच वनविभागाची धाड

सौदा सुरू असतानाच वनविभागानं ही धडक कारवाई

  • Share this:

ठाणे, 31 ऑक्टोबर: भारतात दुर्मिळ पशुपक्ष्यांची बाळगणे, पाळणे, खरेदी, विक्री करण्यावर राज्यात बंदी आहे. मात्र, मुंबईसह ठाण्यातून 88 वन्यजीवांची तस्करी ठाणे वनविभागानं उघड केली आहे. पोपट, खार आणि दुर्मिळ कासवांची तस्करी करताना दोन जणांना ठाणे वनविभागाच्या भरारी पथकानं रंगेहात पकडलं. पोपट आणि कासवांचा सौदा सुरू असतानाच वनविभागानं ही धडक कारवाई केली. धक्कादायक म्हणजे या माध्यमातून अटक केलेल्या तस्करांचं जाळ मुंबईभर पसरलेलं असून वनअधिकारी तपास करत आहेत.

हेही वाचा...धक्कादायक! विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ सहन न झाल्यानं तरुणीची आत्महत्या

जंगली पशु पक्ष्यांची तस्करी हा भारतात कोट्यवधी रुपयांचा व्यापार असून अनेक धनदांडगे आपल्या मनोरंजनासाठी आणि अंधश्रद्धेपोटी या तस्करांकडून हे पशुपक्षी विकत घेतात. असाच एक सौदा करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना ठाणे वनविभागानं एका धडक कारवाईअंतर्गत अटक केली.

ठाण्यातील विवियाना मॉलजवळ प्रतिबंधित प्रजातीच्या पक्ष्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वनविभागाने शिताफीने ताब्यात घेतलं. आरोपींकडून तीन दुर्मिळ पोपट जप्त केलं. उप वनसंरक्षक ठाणे, सहा वनसंरक्षक गिरीजा देसाई पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, हेमंत कारंडे, वनरक्षक दत्तात्रय पवार यांच्या पथकाने ठाण्यातील wildlife welfare association च्या मदतीनं ही कारवाई केली.

हेही वाचा...पत्नीवर मित्राची वाईट नजर...अश्लिल कमेंटही करायचा, पतीनं डोक्यात घातला दगड

सदर आरोपींकडे कसून चौकशी केली असता दोघांनी लपवून ठेवलेले अनेक प्रजातीचे दुर्मिळ पोपट, कासवं आणि indian स्क्विरल अशा एकूण 88 पशुपक्ष्यांची सुटका केली. दोन्ही आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरु आहे. अनेक तस्कर पैशाच्या हव्यासापायी हे अवैध कृत्य करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत, असं वनविभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या