ठाणे, 03 जून : राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांना वंचित राहावे लागत आहे. तर ठाण्यात अभिनेत्री मीरा चोप्राने (Meera Chopra) बनावट ओळखपत्र ( fake identity card case) तयार करून लस (Covid Vaccine)घेतली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. एकूण 21 श्रीमंतांच्या मुलांनी बनावट ओळखपत्र तयार करून लस घेतल्याचे समोर आले आहे.
बोगस फ्रॅंटलाईन वर्कर लस प्रकरणाचा (Bogus frontline worker vaccine case) तपासातून आता धक्कादायक खुलासा झाला आहे. ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. समितीने चौकशी करुन आपला अहवाल सादर केला आहे. यात एक नाहीतर अनेक सेलिब्रिटींनी बोगस कार्ड बनवून लस घेतली असल्याचे समोर आले आहे. आणखी एका सेलिब्रिटींनी बोगस फ्रंटलाईन वर्कर बनून लस घेतली होती.
ओळखलत का यांना? सिनेसृष्टीतील 'ही' लोकप्रिय जोडी अशी पडली होती प्रेमात
एकूण 21 जणांनी अशा प्रकारे लस घेतल्याचे समोर आले आहे. यात 19 श्रीमंतांच्या मुलांना सुपरवायझर, अटेंडंट म्हणून ओळखत्र दिल्याचे उघड झाले आहे. ही ओळखपत्रं देण्यासाठी पैसे घेतल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या केवळ 45 वर्षांहून अधिक वयाच्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क मीरा चोप्रा या सेलेब्रिटीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
'ठरल्याप्रमाणे मी...' संभाजीराजेंचं मराठा समाजाला पत्र, म्हणाले...
या महिला सेलिब्रेटीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्था देखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेतील भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली. तसेच सोशल मीडियातही नेटकऱ्यांनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.