मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ठाणे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; मुसळधार पावसात समुद्रातून मार्ग काढत केली कामगिरी

ठाणे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; मुसळधार पावसात समुद्रातून मार्ग काढत केली कामगिरी

पाऊस आणि समुद्राला आलेली भरती याची तमा न बाळगता ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून (Thane Excise Department) डोंबिवलीजवळील देसाई खाडी येथे हातभट्टीवर धडक कारवाई करण्यात आली.

पाऊस आणि समुद्राला आलेली भरती याची तमा न बाळगता ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून (Thane Excise Department) डोंबिवलीजवळील देसाई खाडी येथे हातभट्टीवर धडक कारवाई करण्यात आली.

पाऊस आणि समुद्राला आलेली भरती याची तमा न बाळगता ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून (Thane Excise Department) डोंबिवलीजवळील देसाई खाडी येथे हातभट्टीवर धडक कारवाई करण्यात आली.

ठाणे, 09 जून : पाऊस आणि समुद्राला आलेली भरती याची तमा न बाळगता ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून (Thane Excise Department) डोंबिवलीजवळील देसाई खाडी येथे हातभट्टीवर धडक कारवाई करण्यात आली. एका छोट्या रबरी बोटच्या साह्याने काही अंतरापर्यंत समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर त्यानंतर पुढे पोहत जाऊन पोलीस अधीक्षक नितीन घुले आणि त्यांच्या टीमने समुद्रकिनार्‍यापासून बऱ्याच अंतरावर तिवरांच्या झाडांमध्ये सुरू असलेली मोठी हातभट्टी उद्ध्वस्त केली.

नितीन घुले यांनी केलेली कारवाई आतापर्यंतची हातभट्टीवरील सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई मानली जात आहे. पावसाळ्यात अशा प्रकारच्या हातभट्यांची उभारणी जोरात केली जाते. त्यामुळे या काळात उत्पादन शुल्क विभागाची विशेष करून समुद्रकिनाऱ्यांवर आणि खाड्यांलगत असलेल्या तिवरांच्या झाडांवर नजर असते. तिवरांच्या झाडांचा आणि पडणार्‍या पावसाचा फायदा घेऊन समुद्राला भरती असते तेव्हा अशा प्रकारच्या हातभट्ट्या जोरात चालतात. मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू बनवली जाते. अशा प्रकारची दारू बनवण्यास कोणताही परवाना नसून अशा प्रकारची दारू आरोग्यास हानीकारक आहे. याच कारणामुळे उत्पादन शुल्क विभाग अशा हातभट्ट्यांवर कारवाईच्या दृष्टीने सतत सतर्क असते. त्याचाच एक भाग म्हणून आजची ही कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा - संतापजनक..! 10 वर्षीय मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार, व्हॉट्सअॅपवरील VIDEO पाहून वडील हादरले!

या कारवाईत तब्बल 92 हजार 800 लिटर मद्य बनवायला लागणारे रसायन, 446 प्लास्टिक ड्रम आणि लोखंडी टोप असा जवळपास दोन लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडू नष्ट करण्यात आला. ही हातभट्टी पुन्हा उभी राहू नये, याकरता गळ्या एवढ्या पाण्यात उभे राहूनही कारवाई करताना मध्य बनवण्याकरता लागणारे रसायनाचे ड्रम नष्ट करण्यात आले. कारवाई दरम्यान हे  ड्रम वाहून जात होते. त्यामुळे ते पुन्हा कोणाच्या हाताला लागू नये, यासाठी ते सर्व शोधून कधीच वापरता येणार नाहीत या पद्धतीनं नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

First published:

Tags: Thane, Thane crime news