मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाण्यातील 'या' गावात अद्याप एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

ठाण्यातील 'या' गावात अद्याप एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. ठाण्यात (Thane district) असं एक गाव आहे जिथे एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही आहे.

ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. ठाण्यात (Thane district) असं एक गाव आहे जिथे एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही आहे.

ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. ठाण्यात (Thane district) असं एक गाव आहे जिथे एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही आहे.

  • Published by:  Pooja Vichare
ठाणे, 06 जून: ठाणे (Thane) जिल्ह्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरस सारख्या संकट सामना करत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा (Covid-19 infection) आकडा कमी जास्त होत असतो. मात्र त्यातच ठाण्यात (Thane district) असं एक गाव आहे जिथे एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद नाही आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काळभोंडे (Kalbhonde village) हे गाव आहे. या गावात 1, 560 जणांची लोक वस्ती आहे. मार्च 2020 ला लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जवळपास 440 दिवसांनंतरही या गावात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही (anti-Covid war) या गावात शून्य प्रकरणे नोंदली गेलीत. आता आम्हीत त्याच जोमानं तिसऱ्या लाटेचीही तयार करत असल्याचं गावच्या सरपंच देवकी एम. घिरा यांनी सांगितलं आहे. गावातल्या लोकांनी ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन केल्याचं घिरा सांगतात. मुंबई मिरर या वेबसाईटनं या संदर्भातला रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. हेही वाचा- Corona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी  अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय आपत्कालीन घटना वगळता इतर कोणालाही गावात येण्यास परवानगी नव्हती. गावात प्रवेश करणाऱ्यांसाठी योग्य ती सोय करण्यात आली होती. गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता ठेवण्यात आली होती. जो कोणी गावात प्रवेश करेल त्यासाठी काही नियम आखले होते, असं पोलीस भालचंद्र खडके यांनी सांगितलं. डिलिव्हरी व्हॅन्स गावाबाहेर थांबवण्यात यायच्या. आलेल्या सामान सॅनिटाइज करण्यात यायचं. तसंच आलेल्या सामानाचं वितरण रेशन दुकानं आणि इतर दुकानात केलं जायचं, असं ग्रामसेवक प्रशांत मर्के यांनी सांगितलं. हेही वाचा- ''ती एक चूक होती, पण पश्चाताप होत नाही'', फडणवीसांचं मोठं विधान  दर आठवड्याला गावातले स्वयंसेवक ग्रामस्थांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे मोजमाप करतात असं खडके सांगतात. आता तिसऱ्या लाट येणापूर्वीच काळभोंडे गावासाठीची रणनीती आखण्यात आल्याचं खडके म्हणाले.
First published:

Tags: Coronavirus, Thane

पुढील बातम्या