लाल रंगाच्या पत्र्याच्या पेटीत पुरुषाचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

लाल रंगाच्या पत्र्याच्या पेटीत पुरुषाचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

Deadbody in suitcase: ठाण्यातील दिवा खाडी जवळ एका पेटीत मृतदेह आढळून आला आहे.

  • Share this:

ठाणे, 13 मे: ठाण्यात चाललं आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, एका रिक्षाचालकावर गुंडांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यात (Thane) एका पत्र्याच्या पेटीत मृतदेह (dead body found in suitcase) आढळून आला आहे. एका लाल रंगाच्या पत्र्याच्या पेटीत पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (13 मे 2021)) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास दिवा-शिळफाटा मार्गावरील खर्डी गाव येथे एक लोखंटी पेटी आढळून आली. या लोखंडी पेटीतून दुर्गंध येत असल्याची तक्रार स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

ही पेटी उघडली असता सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. कारण या पत्र्याच्या पेटीत चक्क एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 35 वय असलेल्या पुरुषाचा मृतदेह आहे. लाल रंगाची ही पत्र्याची पेटी इथे कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याबाबतही पोलीस अधिक तपास करत आहेत. हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

रिक्षाचालकावर गुंडांचा हल्ला

ठाण्यात लॉकडाऊन आहे जमावबंदी आहे तर मग अस असतानाही ठाण्यात गुंडाचा हैदोस काही कमी होत नाहीये. कधी नंग्या तलवारी नाचवत दोन टोळ्या भिडतात तर कधी या ना त्या कारणाने ठाण्यात मारामारी होतायेत एकदा तर गोळीबार देखील केला गेलाय. असं असताना आठवड्यापूर्वी केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास 3 जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यात रिक्षाचालक संतोष दुबे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 13, 2021, 9:41 PM IST
Tags: crimethane

ताज्या बातम्या