इक्बाल खंडणी प्रकरणात राजकीय नेत्यांचीही नावं !- ठाणे पोलीस आयुक्त

इक्बाल खंडणी प्रकरणात राजकीय नेत्यांचीही नावं !- ठाणे पोलीस आयुक्त

दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढलीय. या प्रकरणात काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलीय.

  • Share this:

रोहिणी गोसावी, प्रतिनिधी

ठाणे, 19 सप्टेंबर : दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे खंडणी विरोधी पथकानं मुसक्या आववळल्या. गेल्या अनेक दिवसांपासुन दाऊदची टोळी ठाण्यात कार्यरत असल्याची माहीती ठाणे पोलीसांना मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं कारवाई करत दाऊदच्या भावाला अटक केलीये. ठाण्यातील एका बिल्डरनं कासारवडवसी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती, यात इक्बाल कासकर हा मोठ्या प्रमाणात खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याआधीही कारकसरनं खंडणीच्या रुपात चार फ्लॅट आणि मोठी रोख रक्कम वसुल केलेली होती, असंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. या तक्रारीच्या आधारे ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकानं काल रात्री इक्बाल कासकरला नागपाड्यातील हसीना पारकरच्या घरातून अटक केली. भायखळ्यातील इमारत दुर्घटनेनंतर इक्बाल हसीना पारकरच्या घरी राहत होता. पोलीस त्याला अटक करायला पोहोचले तेव्हा तो टीव्ही बघत बिर्याणी खात होता. त्याच्यासोबत त्याचे दोन साथिदारही होते.

राजकारण्यांचाही सहभाग

या खंडणी प्रकरणात ठाण्यातील काही राजकारणी आणि बिल्डर यांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. राजकारणी हे नरसेवक आणि त्यांच्या वरच्या पदावरचे असल्याचं बोललं जातंय. लवकरच याचाही तपास करुन हे रााजकारणी नक्की कोण ते समोर येईल असं ठाणे पोलिसांचं म्हणणं आहे.

दाऊदचं नाव घेऊन मागत होते खंडणी

दाऊद इब्राहिमचं नाव घेऊन इक्बाल कासकर लोकांकडे खंडणी मागत होता. त्यामुळं दाऊदचा यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळला तर ताच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसंच या सर्व आरोपींवर मोक्का लावण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय, मोक्कासाठीच्या नियमांमध्ये ते बसतात का याचा तपास गुन्हे शाखा करतेय, ते जर या नियमांमध्ये बसले तर त्यांच्यावर मोक्का लावला जाऊ शकतो.

इक्बालने खंडणी रुपात 4 फ्लॅट बळकावले 

कासकरने ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅट बळकावल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी हे चारही फ्लॅट सील केलेत. या गुन्ह्यात फ्लॅट रिकामे करून घेण्यासाठी बाहेरून शुटर्स मागवल्याची माहितीही तपासात समोर आलीय. कासकरने 10-12 जणांकडून खंडणी मागितल्याची माहिती समोर आली असून त्याच्याविरोधात मोक्का लावता येईल का, याचीही पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा या गुन्ह्याचा पुढील तपास करताहेत.

तक्रादारांना संरक्षण

तक्रारदाराच्या किंवा त्याच्या कुटूंबियांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलीस त्या संरक्षण देणारेत. तसंच ठाणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की ज्यांच्याकडून इक्बालनं खंडणी मागितली असेल त्यांना समोर यायचं आवाहन केलंय.

First published: September 19, 2017, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading