ठाणे, 3 मे : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार (Rape on Minor) केल्याची धक्कादायक घटना 2017 मध्ये समोर आली होती. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या मुलाला 10 वर्षांची सश्रम कारावासाची (Rigorous Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या विशेष पोक्सो न्यायालयाने (Special POCSO Court of Thane District) हा निर्णय दिला.
विशेष पोक्सो (बाल लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण) न्यायालयाच्या न्यायाधीश कविता डी. शिरभाते यांनी सोमवारी या प्रकरणाचा निकाल दिला. दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
2017 मध्ये घडली होती घटना -
विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयाला सांगितले की, 52 वर्षाचा व्यक्ती आणि त्याच्या 25 वर्षाच्या मुलाने 2017 मध्ये अनेक वेळा भिवंडीतील आपल्या घरात मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी पीडित मुलीचे वय 15 वर्ष इतके होते. त्यांनी सांगितले की, यानंतर मुलगी गरोदर राहिली होती. तसेच तिने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. यानंतर शेजाऱ्यांनी तिला कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला पीडित मुलीची मदत केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दोनही आरोपींना अटक करण्यात आली होती.
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला. नराधमाने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये कैद करुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Rape on minor, Thane