• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी
  • CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 07:04 AM IST | Updated On: Sep 17, 2019 07:04 AM IST

    ठाणे, 17 सप्टेंबर: ठाण्यात गुजराती विरुद्ध मनसे हा वाद सुरु झाला. 11 सप्टेंबरला ठाण्यातील विष्णूनगर परिसरात एका गुजराती व्यक्तीनं लिफ्ट अडकल्याच्या कारणावरून एका मराठी व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्या हसमुख शहाला माफी मागायला लावली. शहा पिता-पुत्रांनी राहुल याना मारहाण केल्याची सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करून काही जणांनी या वादाला मराठी विरुद्ध गुजराथी भाषिक वादाची फोडणी दिली. दोन्ही कुटुंबातील हा वाद नौपाडा पोलीस ठाण्यात पोहचला. त्यात आता मनसेनं शहा यांना माफी मागायला लावल्यानं या वादाला नवं वळण मिळालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी