भाजप नेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, दुर्गंधी पसरल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

भाजप नेत्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, दुर्गंधी पसरल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

विलास कांबळे यांची पत्नी सुवर्णा कांबळे या देखील ठाणे महापालिकेत नगरसेविका आहे.

  • Share this:

ठाणे, 29 मे: भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुर्गंधी पसरल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. तातडीने पोलिसांना बोलावण्यात आलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु आहे. विलास कांबळे यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही. विलास कांबळे यांची पत्नी सुवर्णा कांबळे या देखील ठाणे महापालिकेत नगरसेविका आहे.

हेही वाचा.. डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मिळालेली माहिती अशी की, विलास कांबळे हे ठाणे महापालिकेत स्थायी समितीचे माजी सभापती होते. ते गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलमध्ये राहात होते. कांबळे यांच्या रुममधून दुर्गंधी आल्याने हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावले. त्यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. हृदयविकाराच्या धक्क्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कांबळे यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 15 ड मधून ते नगरसेवकपदी निवडून आले. विलास कांबळे सुरुवातीला बसपमध्ये होते.

हेही वाचा.. ग्रामपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांची रंगली मद्यपार्टी; अशी झाली पोलखोल

'वागळे इस्टेट परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने जागरूक होते. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली' असं ट्वीट करुन भाजप नेते निरंजन डावखरे यांनी केलं आहे.

First published: May 29, 2020, 6:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या