ठाणे, 1 मे: लोकल ट्रेनमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोबाइल चोरट्याच्या झटापटीत महिला प्रवासी विद्या पाटील यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. या घटनेला 24 तास होत नाही तेच आता दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशाने टीसीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात टीसी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकात नेहमी प्रमाणे टीसी प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करत होते. यावेळी एका प्रवाशाने टीसीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशाने केलेल्या या हल्ल्यात दोन टीसी जखमी झाले आहेत. तिकीट मागितल्याच्या रागातून त्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रवासी कोण होता या बाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत असून आरोपी प्रवाशाचा शोध सुरू आहे.
आधीच मनुष्यबळ कमी, सगळीकडं कसं लक्ष देणार! महिलेच्या मृत्यूवर रेल्वे पोलिसाचं अजब उत्तर
डोंबिवलीतील महिलेचा मृत्यू
29 मे च्या रात्री कळवा रेल्वे स्थानकावर एका मोबाईल चोरट्याने एका महिला प्रवासी डब्यात चढून विद्या पाटील या महिलेचा मोबाइल चोरला. यावेळी चोरासोबत झटापट करताना विद्या चव्हाण यांचा तोल जाऊन त्या रेल्वे खाली पडल्या. रेल्वेतून पडल्याने त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण जर यावेळेस महिला प्रवासी डब्यात जर पोलिस असते तर आज विद्या पाटील यांचा जीव वाचला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai local, Thane