Home /News /maharashtra /

पतपेढी व्यवस्थापकाची आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट

पतपेढी व्यवस्थापकाची आत्महत्या, पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट

रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डोंबिवली, 3 ऑक्टोबर : ठाकुर्लीतील सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादीत मुंबई शाखेचे व्यवस्थापक योगेश आरोटे (वय 44) यांनी शनिवारी सकाळी पतपेढीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हनुमान मंदीरजवळ नवनंदा सोसायटीमध्ये योगेश आरोटे वास्तव्यास होते. ठाकुर्ली येथेच बुटाजी टॉवरमध्ये तळमजल्यावर मधुकर सहकारी पतपेढीची शाखा आहे. शनिवारी सकाळी पतपेढीतील लिपीक अमित चौधरी हे कार्यालयात आले असता त्यांना बैठकीच्या खोलीत योगेश यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले. लिपीक अमित चौधरी यांनी याविषयीची माहिती रामनगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोहर घाडगे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. योगेश यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी मी स्वतः माझे जीवन संपवत असून यासाठी कोणीही दोषी नसल्याचं लिहिले आहे. हेही वाचा - विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, सुसाइड नोट निघाली बनावट याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास मनोहर घाडगे करत आहेत. योगेश यांचा मृतदेह रुक्मिणीबाई येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येचा या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Dombivali, Thakurli

पुढील बातम्या