मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, महाजॉब्स वेबपोर्टल झाले लाँच

मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, महाजॉब्स वेबपोर्टल झाले लाँच

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले

  • Share this:

मुंबई, 06 जुलै :  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण  करण्यात आले आहे.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. राज्यात सध्या  65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

बाप रे बाप, कोब्रा नागाने गिळला दुसरा साप; पाहा हा पुण्यातला थरारक VIDEO

मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे  कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे  उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसंच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक, निर्णय विरोधात गेल्यास आंदोलनाचा इशारा

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कुठे भरायची माहिती?

राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्हाला माहिती भरायची आहे. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक उपस्थित होते.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 6, 2020, 2:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading