Home /News /maharashtra /

'माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार', जळगावात एसटी कंडक्टरने घेतला गळफास

'माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार', जळगावात एसटी कंडक्टरने घेतला गळफास

मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने एसटी वाहक-चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

जळगाव, 09 ऑक्टोबर : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आणखी एका एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) कंडक्टरने ( Bus Conductor)आत्महत्या (Sucide) केल्याची घटना (jalgaon) घडली आहे. 'माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने जीवन यात्रा संपवली आहे. कोरोनाच्या काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. 'एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा' असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने एसटी वाहक-चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या परिस्थितीतून मनोज चौधरी याने हे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली आहे. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एसटी मंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज चौधरी कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे. रत्नागिरी एसटी आगारात कंडक्टरची आत्महत्या तर रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बसवाहकाने (Conductor )आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असं या बस वाहकाचे नाव आहे. मोठी बातमी, मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पालिकेनं काढला आदेश पांडुरंग गडदे हे रत्नागिरी एसटी बस आगारात सेवेत होते. 8 नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे रूमचे पार्टनर पी.ए.तांदळे हे गडवे यांना उठवण्यासाठी गेले होते. रूमचा दरवाजा वाजवल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना संशय बळावला. त्यामुळे तांदळे यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पांडुरंग गडदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने तांदळे यांनी या घटनेची माहिती आगार नियंत्रक रमेश केळकर यांना माहिती दिली. पांडुरंग गडदे यांच्या आत्महत्येमुळे आगारात एकच खळबळ उडाली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या