ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये फडणवीसांचा 'हा' निर्णयही मोडीत!

ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये फडणवीसांचा 'हा' निर्णयही मोडीत!

अखेर 14 दिवसांनंतर ठाकरे सरकारने खातेवाटप जाहीर केलं आहे. तर अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडे आणि महसूल खाते हे काँग्रेसला ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : अखेर 14 दिवसांनंतर ठाकरे सरकारने खातेवाटप जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला. आधीच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आता खातेवाटपात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णयही मोडीत काढला आहे.

ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये महत्त्वाचं असलेलं गृह खातं हे सेनेनं आपल्याकडे ठेवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते हे आपल्याकडे ठेवलं होतं. पाच वर्ष हे खातं त्यांच्याकडेच होतं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा राज्याचा गृहमंत्री हा वेगळा असावा, अशी मागणी केली जात होती. परंतु, फडणवीस यांनी गृहमंत्रिपद आपल्याकडे कायम ठेवलं.

आता महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आलं नाही. त्यामुळे राज्याला स्वतंत्र्य गृहमंत्री मिळाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही गृहमंत्रिपद हे स्वतंत्र्य ठेवण्यात आलं होतं. आर.आर. पाटील यांनी राज्याचं गृहमंत्रिपद भूषवलं होतं. आघाडी सरकार गेल्यानंतर फडणवीस यांनी हे पद आपल्याकडे ठेवलं. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे गृहमंत्रिपद हे स्वतंत्र्य ठेवण्यात आलं आहे.

असं आहे खातेवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -  सामान्य प्रशासन, विधी व न्याय, माहिती जनसंपर्क यासह अनेक खाती

एकनाथ संभाजी  शिंदे - गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

जयंत  पाटील - वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

छगन  भुजबळ - ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

बाळासाहेब  थोरात - महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

नितीन  राऊत    - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

शिवसेनेकडे कोणती खाती?

ठाकरे सरकारच्या खातेवाटपामध्ये शिवसेनेनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृह खाते हे आपल्याकडे ठेवलं आहे.  त्याच बरोबर नगर विकास, उद्योग आणि उच्च व तंत्रशिक्षण ही महत्त्वाची खातीही आपल्याकडे ठेवली आहे. सध्या सर्व खातीही एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

राष्ट्रवादीकडे कोणती खाती?

राष्ट्रवादीने आपल्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात वित्त आणि नियोजन खाते ठेवले आहे. त्यासह गृहनिर्माण, सहकार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास सारखी महत्त्वाची खातीही ठेवली आहे.

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

काँग्रेसकडे कोणती खाती?

या खातेवाटपात काँग्रेसकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम सारखी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहे.

महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या