मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाकरे सरकार मराठवाडा-विदर्भ विरोधी, देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

ठाकरे सरकार मराठवाडा-विदर्भ विरोधी, देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

 'महाविकास आघाडी सरकारने स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काची होती.

'महाविकास आघाडी सरकारने स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काची होती.

'महाविकास आघाडी सरकारने स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काची होती.

  • Published by:  sachin Salve
लातूर, 03 ऑक्टोबर : भाजपचे (bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) मराठवाड्यातील (marathwada rain) अतिवृष्टी भागाची पाहणी करत आहे. आज लातूरमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार (mva government) हे मराठवाडा आणि विदर्भ विरोधी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात गेली आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी लातूरमध्ये पाहणी केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असता ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. 'महाविकास आघाडी सरकारने स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. मंडळं ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काची होती. पण, मराठवाड्याला ज्यामुळे न्याय मिळू शकला असता त्याची हत्या करण्याचे काम या सरकारला केलं आहे,  मराठवाडा काम बंद केलाय, विजेची सवलत बंद केली आहे. आज मोठ्या प्रमाणात शेती पंपाच्या वीज असतील, ग्रामपंचायती अंतर्गत शाळांचे वीज रस्ते घरांच्या विजा तोडण्याचे काम सरकार करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. Nagpur Job Alert: तायवाडे कॉलेज कोराडी नागपूर इथे तब्बल 62 जागांसाठी पदभरती 'शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, विम्याची मदत करावी. मला असे वाटते की, सरकारने मॅजिकल पाहणी केली आहे. त्याच्या आधारावरच विम्याचे हक्क मिळाले पाहिजे.  एका जिल्ह्यात 800 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना सरकार कुठेतरी कमी पडत आहे, सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सरकारपर्यंत यांचा आवाज पोहोचत नसेल तर सरकारपर्यंत यांचा आवाज घेऊन जाणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL 'सरकारने विमा कंपन्याला वठणीवर आणलं पाहिजे, आम्ही आमच्या काळात विमा कंपन्याला वठणीवर आणून 4000 कोटीचा विमा मिळवून दिला पण हे सरकार कुठे झोपलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
First published:

Tags: लातूर

पुढील बातम्या