Home /News /maharashtra /

TET exam scam : अश्विन कुमारच्या घरी सापडलेल्या दागिन्याची किंमत तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त!

TET exam scam : अश्विन कुमारच्या घरी सापडलेल्या दागिन्याची किंमत तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त!

   अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले होते.

अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले होते.

अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले होते.

पुणे, 26 डिसेंबर : पेपर लिक प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार (TET examination scam) प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी अश्विन कुमारला अटक केली होती. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल दीड किलो सोन्याचे दागिने सापडले होते. याची किंमत तब्बल 1 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. पेपर लिंक प्रकरणात तुकाराम सुपेकडे मोठे घबाड सापडल्यानंतर आज पुन्हा एकदा एका आरोपीकडे कोट्यवधीचे दागिने सापडले आहे.  टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनीजी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार (Ashwin Kumar) याला बंगळुरूमधून अटक केली होती.  त्यानंतर पुणे पोलिसांनी अश्विन कुमारच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी  दीड किलो सोन्याचे हिरे रत्नजडित दागिने आणि 27 किलो चांदीचे दागिने सापडले होते. आज या दागिन्यांची किंमत काढण्यात आली. तेव्हा या महागड्या दागिन्यांची किंमत तब्बल 1 कोटींच्यावर असल्याचे समोर आले आहे. अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडलं. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हा प्रीतिश देशमुख बरोबर काम करत होता. टीईटी घोटाळ्यातही आणखी एका आरोपीला अटक दरम्यान, पुणे आरोग्य विभागाच्या गट क पेपर फुटी प्रकरणातील एक एजंट सह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एजंट गायकवाड यांच्या सह दोघांना नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.  आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोपी असलेला संजय सानप याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी गायकवाड व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले. तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड दरम्यान, आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी सुपेने लपवून ठेवलेली रक्कम सापडली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या